सातारा/अनिल वीर : हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने हिंदी सप्ताहनिमित्त जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालयातील इ. ६ वी ते इ. १० वी पर्यंतच्या अध्ययनार्थीसाठी जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे.अशी माहिती अध्यक्ष ता. का. सूर्यवंशी यांनी दिली.
तालुका स्तरावर सहा प्रकारच्या स्पर्धा ग्रामीण व शहरी विभागासाठी स्वतंत्रपणे घेतल्या होत्या. या स्पर्धांमधून दोन्ही विभागाचे मिळून ४५१ विदयार्थी प्रथम पाच क्रमांकाने विजयी होवून जिल्हा स्तरासाठी पात्र घोषित झाले होते. जिल्हा स्तरावरील स्पर्धा येथील राष्ट्रभाषा भवनमध्ये संपन्न झाल्या होत्या. इ. ६ वी ते १० वीसाठी इयत्तावार क्रमशः सुलेखन, निबंध, वक्तृत्व, शुध्दलेखन, सामान्यज्ञान व निबंध लेखन या सहा स्पर्धा जिल्हा स्तरावर ग्रामीण व शहरी विभागासाठी स्वतंत्रपणे घेण्यात आलेल्या होत्या. ग्रामीण विभागातून ६८ व शहरी विभागातून ४९ विद्यार्थी प्रथम पाच क्रमांकाचे विजेते घोषित करण्यात आले. या सर्व विजयी विद्यार्थ्यांचे मंडळाच्या वतीने जाहीर अभिनंदन करण्यात आले असून सर्व विजेत्यांना गौरव चिहन, पुस्तके व रोख स्वरूपात आकर्षक बक्षीसे घोषितही करण्यात आली आहेत. जानेवारीमध्ये विशेष कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. असेही कार्यवाह अनंत यादव यांनी सांगितले आहे.