जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धम्म- रमेश घोडेराव, सुरेगाव येथे धम्मज्योत रॅलीचे स्वागत

0

कोपरगांव :-दि. १३ ऑक्टोंबर २०२२

           जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धम्म होय, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या माध्यमांतून जगाला संबोधीत करून त्याबाबतची माहिती दिली असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी केले. सुरेगांव ते येवला मुक्तीभूमि अशी धम्मज्योत रॅली ८७ व्या वर्धापनदिनानिमीत्त काढण्यात आली त्याचे स्वागत संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सुरेगांव येथे उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांच्या हस्ते गुरुवारी झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक विलासराव वाबळे होते. 

          प्रारंभी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यावतीने धम्मरॅलीबाबत माहिती दिली.  रमेश घोडेराव पुढे म्हणाले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला घटना दिली. शिक्षणाचे महत्व पटवून देत त्यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. भारतीय विचारांना जागतिक स्तरावर महत्व मिळवून देण्यांत डॉ बाबासाहेब आंबेकरांचे योगदान मोठे आहे. त्रिसरण, पंचशील, बुध्द, धम्म, संघ वंदना याबाबी महत्वाच्या असुन त्या प्रत्येकाने अंगीकारल्या पाहिजे. 

         याप्रसंगी सर्वश्री. कचरू रोहोम, राजेश निकम, प्रशांत वाबळे, शंकर कदम, कुमार मेहेरखांब, जनार्दन पाटील, शांताराम मेहेरखांब, सोपान सोनवणे, यशवंत निकम, ज्ञानेश्वर वाबळे, दिपक हुडे, रामभाउ राउत, किरण निम, मोतीराम निकम, राजेंद्र शुक्ला, निलेश निकम, देवा निकम, संकेत पगारे, अमोल पगारे, सागर पगारे, अजय पगारे, तुकाराम निकम, चंद्रभान मेहेरखांब, सिध्दार्थ मेहेरखांब, सुनिल खंडवे, जिगर निकम, दिपक निकम, सतिष निकम, भरत वाबळे, श्रीकांत निकम, विशाल निकम, आदित्य निकम, शैलेश निकम, अनिकेत निकम, ऋषीकेशन निकम, किरण निकम, निलेश निकम, वैभव निकम, अभिषेक निकम, प्रतिक निकम, आकाश निकम, अजय निकम, किरण निकम, भूषण निकम, सुरज पवार, अक्षय लाटे, शुभम कटारनवरे, अभिजित कटारनवरे, अजय कटारनवरे, शिरीष घायवट, गौतम घायवट, लहानु जाधव, संतोष जाधव, अमोल निकम, तेजस निकम, दिपक निकम, चंद्रमणी निकम, प्रमोद निकम, आकाश निकम यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते, मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी कुमार मेहेरखांब यांनी आभार मानले.

फोटोओळी-कोपरगांव 

          सुरेगांव ते येवला मुक्तीभूमि अशी धम्मज्योत रॅली ८७ व्या वर्धापनदिनानिमीत्त काढण्यांत आली त्याचे स्वागत संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सुरेगांव येथे उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांच्या हस्ते करण्यांत आले याप्रसंगी संचालक विलासराव वाबळे यांच्यासह विविधस्तरातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here