सिन्नर :तालुका स्तरिय विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी ५० हजाराचा निधी खुप कमी आहे . तो एक लाखापर्यंत करावा अशी मागणी सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस बी देशमुख यांनी आ . माणिकराव कोकाटे यांच्या कडे केली. सध्याचा निधी कमी पडत असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर आ .कोकाटे _यांनी तत्वत : मान्यता देवून सि .ई.ओ. यांना त्वरित पत्र देवुन सिन्नर सह सर्वच तालुक्यांना एक लाख रू निधी देण्याची तरतुद करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
नुकतेच 51 वे तालुकास्तरीय विभाग सिन्नर व सिन्नर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघ व नवजीवन डे स्कूल सिन्नर यांच्या संयोगाने दिनांक 29 -30 डिसेंबर 2023 रोजी भरविण्यात आले होते सदर प्रदर्शनात इयत्ता सहावी ते नववी 56 उपकरणे तसेच नववी ते बारावीची 57 उपकरणे तसेच इयत्ता पहिली ते पाचवी तीन उपकरणे दिव्यांग विद्यार्थी तीन उपकरणे शैक्षणिक साहित्य प्राथमिक शिक्षक सात उपकरणे शैक्षणिक साहित्य माध्यमिक विभाग आठ उपकरणे शैक्षणिक साहित्य परिचर विभाग आठ उपकरणे अशी एकूण 141 उपकरणे दाखल झाली होती या उपकरणांमधून विद्यार्थी उपकरणे प्रथम, द्वितीय ,तृतीय विद्यार्थी. प्रथम ही उपकरणे जिल्ह्याला जाणार आहे त्यापैकी प्राथमिक गट शैक्षणिक साहित्य प्रथम क्रमांक कु इन्शा इम्तियाज सय्यद नवजीवन डे स्कूल सिन्नर, द्वितीय क्रमांक -कु.कोमल भाऊ पाटील, कु. वेदिका महेश शिरसाट जि .प.मुसळगाव ,तृतीय -वैभवी नारायण गडाख ,कु.समृद्धी उत्तम गडाख त्याचप्रमाणे माध्यमिक गट, प्रथम क्रमांक कु. पेखळे शिवप्रसाद सुनील ,कु.बैरागी अंकित शाम -श्री संत हरीबाबा विद्यालय पांगरी व द्वितीय क्रमांक कु.शिंदे जय जितेंद्र तसेच कु. वारुंगसे कृष्णा सुनील, कु. व्यवहारे अथर्व जयवंत, कु. देशमुख कृष्णा आशिष ,प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य प्राथमिक गट सौ. रुपाली काकड लो.शं .बा.वाजे विद्यालय व माध्यमिक विभाग शैक्षणिक गट- श्रीमती पाटील एस .बी.-जनता विद्यालय सोनांबे, प्रयोगशाळा सहाय्यक परिचर प्रमोद अरुण आंबेकर- शेठ ब. ना .सारडा तसेच दिव्यांग विभाग कु. कार्तिक भाऊसाहेब शिंदे -श्री ब्रह्मानंद इंग्लिश स्कूल यांचे बक्षीस वितरण झाले.
पारितोषिक वितरणाच्या वेळी कार्यक्रमाच्या मध्यस्थाने नवजीवन डे स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी देशमुख आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब, माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी प्रविणजी पाटील ,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे सचिव डॉक्टर मच्छिंद्र कदम, मुख्याध्यापक संघाचे राज्य सचिव एस बी देशमुख सर, गटशिक्षणाधिकारी डॉ.विजय बागुल, शिक्षण विस्तार अधिकारी सौ मंजुषा साळुंखे मॅडम, स्कूलच्या मुख्याध्यापिका वृषाली लोंढे ,अनिता सूर्यवंशी , पाटील सुरेश देशमुख ,सौ. योगिता भाटजीरे ,.कैलास सांगळे, विज्ञान – गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष.शिवाजी गाडेकर सर , .एस.टी .पांगारकर, .रविंद्र गिरी ,. एल .एन.शेळके ,प्रीती पवार, व्ही. बी .पवार, मधुकर बागुल ,जमीर सय्यद, फड सर ,कांदळकर सर, सोनवणे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
*माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे यांनी तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनासाठी दीड लाखापर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे संस्थापक . सुभाषजी देशमुख सर (बडे सर) यांनी विज्ञान प्रदर्शनाची रूपरेषा त्यातील बदल काळानुरूप होण्यासाठी प्रत्यक्ष जीवनात याचा कशाप्रकारे उपयोग होऊ शकेल याबाबत मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी सूत्रसंचालन. पांगरकर तसेच नवजीवन शाळेच्या सौ. सविता फड व सौ. निशा भागवत ,यांनी केले या कार्यक्रमासाठी सौ. गौरी परदेसी मॅडम तसेच . निलेश भाऊ सर त्याचप्रमाणे इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले