तुझ्या भुकेचे कोडे उलगडावे,तुझे दुःख सारे गळून पडावे…!

0

सुरेगाव (रस्ते) येवला प्रतिनिधी

स्वतः भाकरीचा चंद्र शोधायला अर्थात मजूर-रोजंदारी कामाला निघालेल्या माय माऊल्या रस्त्याने निघालेल्या वेळ सकाळी दहा वाजेची ठिकाण येवला-संभाजीनगर हायवे – सुरेगाव (रस्ता) ता.येवला  सदर रस्त्याने जाणाऱ्या एका दिव्यांग/असहाय सायकल चालकास आपल्या दुपारच्या जेवनाकारता सोबत घेतलेल्या डोईवरच्या भाकरी सोडून अन्नदान करणाऱ्या मजूर महिला अध्यापक कार्यास निघालेल्या ज्ञानदात्या हरिभाऊ सोनवणेसर,शरद शेजवळसर शिक्षक समता माध्यमिक विद्यालय, सुरेगाव-रस्ता शिक्षकांच्या दृष्टीस आल्या आणि हा फोटो त्यांनीच टिपला आहे… आपल्या दैनिकासाठी प्रसिद्धी करता पाठवत आहे.

      वामनदादा कर्डकांच्या ह्याओळी …

माणसा इथे मी तुझे गीत गावे,असे गीत गावे तुझे हित व्हावे।

असे तुझे माझे नाते लढावे,

तुझ्या संकटाशी इथे मी लढावे।।

एकाने हसावे लाखाने रडावे,

असे विश्वात येथे नाव उरावे।

तुझ्या भुकेचे कोडे उलगडावे,

तुझे दुःख सारे गळून पडावे।

येथे सारे सारे नवे पेरताना,

वामन परी मी तुझे हात व्हावे।

गरजू दिव्यांची अन्नदानरुपी माऊली झालेल्या सुरेगाव (रस्ता) येथील सविताताई आसणे,नीलिमाताई मगर, पल्लवी भोसले,मनीषा आसणे अल्का औटे,मनीषा सोनवणे, सारला औटे यांच्या मानवतावादी कृतीस त्रिवार वंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here