10 लाखाची खंडणी अहमदनगर मधील नागापूर येथिल जिमखान्यात पाठविण्यास सांगितले
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी राजेंद्र उंडे
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथिल रहिवाशी पोलिस हवालदार भाऊसाहेब आघाव यांच्या आत्महत्येनंतर पेालिस अधिकार्यांसह तीन कर्मचार्यांवर गुन्हा दाखल होऊनही अद्यापी अटक झालेली नाही. आघाव कुटुंबियांना दोन निनावी पञ पोष्टाने मिळाले असुन त्या पञात 10 लाख रुपयाची खंडणी मागण्यात आली असुन आघाव कुटुंबाला संपविण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.खंडणी पोहच न केल्यास व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने राहुरी पोलिस ठाण्यात प्रेमकुमार आघाव याच्या फिर्यादी वरुन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या धमकीच्या पञामुळे आघाव कुटुंब भितीच्या सावटाखाली असुन वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांने लक्ष घालून आघाव कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आघाव कुटुंबाने तीव्र संताप व्यक्त त्या चारही आरोपींना अटक होत नसल्यामुळे 10 आँक्टोबर रोजी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. खाकी वर्दीसाठी आयुष्य खर्च करूनही पोलिसच पोलिसांना न्याय देत नसेल तर खाकी वर्दीची विश्वासार्हता राखणार कोण? लोकशाही मार्गाचा अवलंब करुन न्याय मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करावे लागणार आहे.असे आघाव कुटुंबियांच्या नातलगांनी सांगितले.
मृत पोलिस कर्मचारी आघाव यांचा मुलगा प्रेमकुमार भाऊसाहेब आघाव यांनी फिर्याद वरुन आरोपी साहय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे,सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश रामभाऊ निमसे, एक महिला पोलिस कर्मचारी व भाऊसाहेब शिवाजी फुंदे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच 10 लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या कडील तपास काढून घेवून पोलिस उपअधिक्षक राहुल मदने यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.दरम्यान सीआय डी च्या पथकाने राहुरी पोलिस ठाण्यात भेट देवून आघाव यांच्या आत्महत्ये बाबत माहिती घेतल्याने हा तपास सी .आय .डी वर्ग होतो की काय ? असा प्रश्न येथिल नागरिकांना व्यक्त केला आहे.
पोलिस हवालदार भाऊसाहेब दगडू आघाव यांच्याकडे आरोपी हे १० लाख रूपयांची मागणी करत होते. या प्रकाराला कंटाळून भाऊसाहेब आघाव यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या प्रकरणा नंतर चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र काल भाऊसाहेब आघाव यांच्या कुटूंबाला एका निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली. प्रेमकुमार भाऊसाहेब आघाव याने राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केलाय. त्या फिर्यादीत म्हटले आहे कि, काल भाऊसाहेब आघाव यांच्या घरी पोस्टाने दोन निनावी पत्र आले. आलेले पाकिट फोडून वाचले असता त्यात मयत भाऊसाहेब आघाव यांचा बदनामीकारक मजकूर लिहून सुसेन महाराज नाईकवाडे अहमदनगर नागापूर एम आय डि सी जीमखाना हाॅल येथे १० लाख रूपये जमा करा. कै. भाऊसाहेब याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात येईल. कुटूंबातील एकही शिल्लक राहणार नाही. अशी धमकी लिहीली होती. प्रेमकुमार आघाव यास पोस्टाद्वारे दोन सीलबंद पाकिटामध्ये धमकी देऊन अज्ञात इसमाने खंडणीची मागणी केली आहे.
या प्रकारामुळे भाऊसाहेब आघाव आत्महत्या प्रकरण पून्हा चर्चेत आले आहे. आत्महत्या प्रकरणातील आरोपी अद्याप पसार आहेत. त्यांना ताबडतोब अटक करण्याची मागणी नातेवाईक करीत आहेत.
भाऊसाहेब आघाव यांना निनावी पत्राद्वारे आलेल्या धमकी नूसार आघाव कुटूंबीयांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आघाव कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात आणखी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.