नगर- नाशिककर झोपेत असतानांच जायाकवाडीला सोडले पाणी …

0

कोपरगाव/नाशिक :   नगर नाशिकची जनता झोपेत असतानाच शुक्रवारी रात्री ११ वाजता गोदावरी ऊर्ध्व खोऱ्यातील धरणांतून  जायकवाडीसाठी Jayakawadi गोदावरी Godawari पात्रातून १०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. विशेष म्हणजे कालच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने राज्य शासनाला पत्र पाठवून कायदा सुरक्षेचे कारण सांगत जायकवाडीला  पाणी सोडू नये अशी विनंती केली होती. याचा अर्थ राज्य सरकार आणि महामंडळाने या पत्राचा फार्स करीत दोन्ही जिल्ह्यातील नेते आणि जनतेलाही गाफील ठेवले. 

जायकवाडी धरणात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत गोदावरी मराठवाडा विकास प्राधिकरणाने दारणा, गंगापूर मुळा,भंडारदरा धरण समूहातून  ८.६ टीएमसी 8.6 TMC पाणी  सोडण्याचे आदेश काढले होते . या निर्णयामुळे नगर- नाशिक जिल्ह्यातील Ahmednagar – Nashik वरील धरणाच्या लाभक्षेत्रातील जनतेमध्ये प्रचंड रोष व गोंधळ निर्माण झाला होता. कारण या दोन्ही जिल्ह्यामध्ये यावर्षी अल्प पर्जन्यामानामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि जायकवाडी धरणामध्ये मुबलक पाणी असतानाही   राज्य सरकारने पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेक शेतकऱ्यांनी, नेते  आणि साखर कारखान्यांनी न्यायालयात धाव घेतली होती .यावर उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने वरील सर्वांच्या याचिका दाखल करून घेतल्या मात्र जायकवाडीला  पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालयाच्या या आदेशाचे दोन्ही विभागातील नेत्यांनी आपापल्या सोयीने अर्थ काढण्यास सुरवात केली होती . यादरम्यान सुरु असलेल्या गोंधळाचा फायदा घेत काल रात्री ११ वाजता दारणा ,गंगापूर ,भंडारदरा, मुळा धरणातून मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पथकाच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले आहे. शिवाय या प्रक्रियेला होणारा विरोध लक्षात घेता कालव्याच्या संपूर्ण परिसरात जमावबंदी आदेश लागु करण्यात आला आहे. सद्य १०० क्युसेक्स असणारा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचेही महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  

महामंडळाच्या आदेशानुसार गोदावरी दारणा समूह (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून २.६४३ टीएमसी,गंगापूर धरण समूहातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी) ०.५ टीएमसी ,  मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्प समूह २.१०टीएमसी , प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) प्रकल्प समूहातून ३.३६ टीएमसी असे एकूण ८.६०३  टीएमसी पाणी जायकवाडीत साठी  सोडण्यात येणार असले तरी प्रत्यक्षात मात्र अवघे ५ टीएमसीच पाणी जायकवाडी धरणात पोहचणार आहे म्हणजे ३. ६ टीएमसी पाण्याचा निव्वळ अपव्यय होणार आहे. आणि हे या पाण्यामुळे .जायकवाडी धरणाची पाणीपातळी केवळ ४५ टक्के होणार आहे.  

नगर नाशिकची जनता झोपेत असताना जायकवाडी ला पाणी सोडण्यात आले. या निर्णयामध्ये मराठवाड्याच्या नेत्यांना ,न्यायालयाला नावे  ठेवताना ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यावर पूर्णपणे अन्याय करणारा समन्यायी पाणी वाटप कायदा सभागृहात तयार  होत असताना नगर -नाशिक जिल्ह्यातील नेते त्यावेळी झोपेत राहिल्याने हक्काचे पाणी पळविल्या गेले. यामुळे दोन्ही जिल्ह्यातील जनतेची झोप मात्र कायमची उडाली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here