पैठण,दिं.१५ : गेल्या तीन वर्षांपासून कोरोना आजाराने थैमान घातले होते त्यामुळे महाराष्ट्रातील संत महंताचा वार्षीक उत्सव रद्द करावा लागला होता परंतु सन २०२३ च्या प्रारंभी हा कोरोना आजार पुर्नताहा नियंत्रणात आल्यामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी यात्रा भरू लागल्या आहेत.
पैठण येथील नाथषष्ठी सोहळ्यासाठी जायकवाडी परीसरातून पायी जात असलेल्या संत महंतांनी दिलेल्या प्रतीक्रीया.
महंत तथा पिठाधिश श्री क्षेत्र मुर्डेश्वर संस्थान ओंकार गिरी महाराज : यांनी सांगितले ब्रम्हलीन महंत बालयोगी काशिगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने गेल्या २८ वर्षांपासून नाथषष्ठी निमित्ताने पायी दिंडी येते मात्र यंदाच्या नाथषष्ठी मध्ये आनंद भरून ओसंडून वाहताना वारक-यात पाहवयास मिळाली कोरोनावर भक्ती पंथानीच मात केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.नाथषष्ठी मध्ये आल्यानंतर जे भक्त असतील त्यांनी अंतःकरणात लोभ ठेवू नये जे ज्ञानी असतील त्यांनी त्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्याला कमी लेखन्या करता करू नये पैसा असेल तर त्या अर्थाचा उपयोग दुसऱ्यावर अत्याचार करण्यासाठी करू नये एवढा संदेश जरी अंतःकरणात ठेवला तरी नाथांची वारी सफल झाली असे समजा.
पिठाधिश महंत सर्वानंद सरस्वती महाराज(ब्रम्हलीन बालयोगी काशिगिरीजी महाराज आश्रम धानोरा) : ब्रम्हलीन महंत बालयोगी काशिगिरीजी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने त्यांच्या जन्मभुमी आश्रम धानोरा येथुन पैठण येथे पायी दिंडी घेऊन आलो आहे यंदाची ही नाथषष्ठी ही आमच्या दिंडीसाठी प्रथम आहे.
अरूण देऊळगावकर: म्हणाले की गेल्या तीन वर्षांनंतर वारक-यांच्या पायी दिंडयाचा महापुर नाथषष्ठीत पाहवयास मिळाल्याचा खुप खुप आनंद झाला वारक-यांच्या आशिर्वादामुळे आलेल्या संकटावर मात करता येते याचा हा अनुभव मला पाहवयास मिळाला.
हभप विद्याताई महाराज जवळेकर : यावेळी बोलताना म्हणाल्या की जीवना मध्ये सुख पाहिजे असेल तर वारकरी होणे स्वीकारावे तसेच जीवना मध्ये अमर व्हायचे असेल तर भारत मातेचा दास व्हावे असेही सांगितले.
पंचमुकेश्वर संस्थान तळाभाटपुरीचे महंत महादेव पुरी बाबा महाराज : म्हणाले की,संत एकनाथांच्या वाड्यावर अन्नदानाच्या पंगती दररोज उठायच्या त्या पंकतीत पुरणपोळी चा खास प्रसाद असायचा त्या मागचा उद्देश असा असायचा की, लोकांनी गोडबोलावे,गोड रहावे असा होता त्यामुळे लोकांनवर चांगले संस्कार घडले आम्हीही यावर्षीच्या नाथ षष्ठीत पुरणपोळी तथा मांडे प्रसाद दिंडीतील भाविकांना घाऊ घातला.
हभप सतीश महाराज लातुरकर आळंदी देवाची : हेही आपल्या दिंडीसह सहभागी झालेले आहेत यावेळी बोलताना ते म्हणाले की शासनाने ७५ वर्षांवरील वयोवृद्धांना मोफत प्रवास सवलत दिल्यामुळे ७५ ओंलाडलेले बहूसंख्य वयोवृद्धही त्यांच्या सोबत दिंडीत आले होते दिंडीतील वयोवृद्धांनी एसटीची सवलत मिळाल्यामुळे नाथनगरीचे दर्शन मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.