❂ दिनांक:~ 30 ऑगस्ट 2022 ❂*
वार ~ मंगळवार
आजचे पंचाग
*भाद्रपद. 30 ऑगस्ट*
*तिथी : शु. तृतीया (मंगळ)*
*नक्षत्र : हस्त,*
*योग :- शुभ*
*करण : वणिज*
*सूर्योदय : 06:06, सूर्यास्त : 06:54,*
सुविचार
*सुख म्हणजे,*
*कालच्या दिवसाची खंत नसणे*,
*आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे, आणि उद्याच्या दिवसाची चिंता नसणे*….
म्हणी व अर्थ
*कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे*
*अर्थ :-*
*पूर्वग्रहदूषित किंवा स्वत: वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसत असतात.*
दिनविशेष
*या वर्षातील 242 वा दिवस आहे.*
महत्त्वाच्या घटना
*१५७४: गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले.*
*१८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.*
*१८३५: अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली.*
*१९४५: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.*
*१९७९: सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड – कुमेन – मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे*
*जन्मदिवस / जयंती*
*१९०३: हिंदी कथाकार, कादबंरीकार, कवी भगवतीचरण वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९८१)*
*१९०४: उद्योगपती नवल होर्मुसजी टाटा यांचा जन्म.*
*१९२३: हिंदी चित्रपट गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेंद्र यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९६६)*
*१९३०: संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल २००८ – डोंबिवली, मुंबई)*
*१९३०: अमेरिकन उद्योगपती वॉरन बफे यांचा जन्म.*
*१९३४: लेग स्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००५)*
*१९३७: मॅक्लारेन रेसिंग टीम चे संस्थापक ब्रुस मॅक्लारेन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९७०)*
*१९५४: बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष अलेक्झांडर लुकासेंको यांचा जन्म.*
*१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी रवीशंकर प्रसाद यांचा जन्म.*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*१७७३: सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली. (जन्म: १० ऑगस्ट १७५५)*
*१९४०: इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८५६)*
*१९४७: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन. (जन्म: १ जून १८७२)*
*१९८१: शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक जे. पी. नाईक यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९०७)*
*१९९४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी शं. गो. तुळपुळे यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)*
*१९९८: स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार नरुभाऊ लिमये यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)*
*२००३: अमेरिकन अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)*
*२०१४: भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन. (जन्म: २७ मे १९२८)*
*२०१५: भारतीय विद्वान लेखक एम. एम. कळबुर्गी यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८)*
सामान्य ज्ञान
*पुणे जिल्ह्यातील मोरगांव येथे कोणते प्रसिद्ध दैवत आहे?*
*मयूरेश्वर (अष्टविनायक गणपती)*
*भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे?*
*२२*
*आकाशात उंच फेकलेली कोणतीही वस्तु जमिनीवर परत येन्याचे मुख्य कारण कोणते?*
*गुरुत्वाकर्षण*
*स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण?*
*लॉर्ड माउंटबॅटन*
*नोबेल पुरस्काराचा पहिला भारतीय मानकरी कोण?*
रविंद्रनाथ टागोर
* बोधकथा *
*संतुलन*
*गौतम बुद्धाकडून राजकुमार श्रोणने दीक्षा घेतली होती. एकेदिवशी बुद्धांच्या अन्य शिष्यांनी श्रोणची तक्रार करत म्हणाले की ”श्रोण तपाच्या उच्च सीमेपर्यंत पोहोचला आहे पण चिंता वाटते की सारे भिक्षू दिवसातून एकदाच भोजन करतात पण श्रोण मात्र दोन दिवसातून एकदा भोजन करतो आहे. अन्नपाणी ग्रहण न केल्यामुळे तो फारच अशक्त झाला आहे. हाडांचा सापळा दिसायला लागला आहे.” हे ऐकून बुद्धांने श्रोणला बोलावले आणि म्हणाले,” श्रोण, तू पूर्वी सितार चांगले वाजवित होता हे खरे काय? आता वाजवून दाखवू का?” श्रोण म्हणाला,”होय मी आपल्याला सितार वाजवून दाखवू शकतो. परंतु आपण आता सितार का ऐकू इच्छित आहेत हे मला समजले नाही?” बुद्ध म्हणाले,” मी असे ऐकलंय की, सितारच्या जर तारा ढिल्या झाल्या असतील तर ते नीट वाजत नाही.किंवा जास्त घट्ट झाल्या तरी त्यातून चांगले संगीत निर्माण होत नाही.” श्रोण म्हणाला,” होय ते खरे आहे तारा ढिल्या झाल्या तर सूर बिघडणार आणि तारा घट्ट झाल्या तर तारा तुटणार तेव्हा तारा मध्यम असाव्यात” बुद्ध म्हणाले,” सितारप्रमाणेच मानवाचे जीवन आहे, तप करावे पण अन्नही योग्य प्रमाणात भक्षण करावे. भोग अति घेणे वाईट आहे.”*
*तात्पर्य:-*
*’अति सर्वत्रं वर्जयेत’ जीवनात नियम आणि तप आवश्यक आहे पण एका विशिष्ट संतुलनाने. कारण अति तेथे माती हा नियम सगळीकडेच लागू पडतो*
*श्री. देशमुख. एस. बी*
*सचिव*
*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*
कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F
*सौ. सविता एस देशमुख*
*उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.*
*7972808064*