कथा ‘तोडणी’ – लेखक दत्तात्रय विरकर
सिन्नर :पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात ‘लेखक 1 आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष लेखक दत्तात्रय विरकर यांनी हजेरी लावली त्यांचे शिक्षक ,विद्यार्थी व पालक यांनी स्वागत केले.पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख हे होते.इ.७ वीच्या मराठीच्या पुस्तकातील ‘तोडणी’ या पाठाचे लेखन त्यांनी केले असून विद्यार्थ्यांना ऊस तोडणी कामगारांच्या कष्टाची व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आबळ कशी होते हे सांगितले. विद्यार्थ्यांनी वास्तवाचं भान जपलं पाहिजे आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शिक्षण घ्यावे.तसेच एका निर्णयावर ठाम न राहता परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. आपलं ध्येय साध्य झाल्यावर एखादा छंद जोपासावा आपले गुण ओळखून आपले भविष्य घडवावे.
कोणत्याही क्षेत्रात काम करतांना सातत्य ठेवा.त्यातून तुमच्या कौशल्याचा निश्चितच विकास होईल.शिक्षक,पालक यांच्या अपेक्षांचं ओझं सांभाळतांना विद्यार्थी थकून जातात.अपयश हे येणारच आहे ते पचवण्याची ताकद तुमच्यात असू द्या. काही जरी नाही करता आलं तरी चालेल पण देशासाठी एक चांगला नागरिक बना.अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार करू नका,करू देऊ नका.आई-वडील,शिक्षक यांचा आदर करा.नोकरी म्हणजेच संपूर्ण जीवन जगता येऊ शकतं असे नाही व्यापार,शेती,व्यवसाय करून देखील चांगले जीवन जगता येऊ शकतं चांगले जीवन जगण्यासाठी स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आपोआप यशाचा मार्ग दिसेल.शिक्षकांचे रागवणे हाच आयुष्यातील सर्वात मोठा (आशिर्वाद) टर्निग पॉईंट असतो म्हणून शालेय जीवनात शिक्षकांकडून मिळणारे संस्कार आयुष्यभरासाठी पूरक ठरत असतात.यात शिक्षकांचा कुठलाही स्वार्थ नसतो.शिक्षण ही जीवन घडविणारी प्रक्रिया आहे.जीवनात यश मिळविण्यासाठी गुरूंची गरज असते.शेवटी विद्यार्थ्यांना सरस्वती प्राप्त झाली तरच लक्ष्मी प्राप्त होईल.शिक्षणाचा उपयोग फक्त उदरनिर्वाहासाठी न करता समाजासाठी आणि राष्ट्रहितासाठी करा असे आव्हान करून विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी शुभेच्छा व आशिर्वाद दिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी बहुआयांमी व्यक्तिमत्व बनवावे.अपयश ही यशाची पहिली पायरी असून न घाबरता पुन्हा प्रयत्न करून यशाला गवसणी घालावी असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व लेखक परिचय सौ.सविता देशमुख यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.व्ही.निकम यांनी केले व आभार शिंदे सी.बी.यांनी मानले.
याप्रसंगी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के.रेवगडे,बी.आर.चव्हाण,आर.व्ही.निकम,एस.एम. कोटकर, आर.टी.गिरी,एम.सी.शिंगोटे,एम.एम.शेख,सविता देशमुख,सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे, एस. डी.पाटोळे,आर.एस.ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते.