सिन्नर : नव शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता दहावीच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेऊन त्यांना योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी पालक व शिक्षक विचारांची देवाण-घेवाण, पाल्याच्या संदर्भात असणाऱ्या शैक्षणिक अडचणींचा मागोवा घेण्यासाठी व सर्वांशी सुसंवाद साधून आपल्या पाल्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पोषक वातावरण निर्मिती हा उद्देश समोर ठेवून पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकेतून आपल्या विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा लेखाजोखा मांडून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालक, चालक शिक्षक व बालक या सर्वांच्या मदतीने आपण आपल्या पाल्याची गुणवत्ता सातत्याने वाढीसाठी प्रयत्न करू असे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी मार्च २०२४ चा एस एस सी परीक्षेचा शंभर टक्के निकाल उल्लेखनीयअसल्याचे सांगून आपल्या पाल्यास पुढील शैक्षणिक आव्हाने पेलवण्यासाठी सक्षम करावयाचे असेल तर आपल्या पाल्याशी सुसंवाद साधून त्याच्या येणाऱ्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यास त्यास मदत करा व येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानास सामोरे जाण्यासाठी त्याची तयारी करा असे सांगितले.
संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. टी. एस. ढोली यांनी आजपर्यंत विद्यालयात घेतल्या गेलेल्या उपक्रमातून विद्यालयाची प्रगती होत असल्याचे सांगून ग्रामीण भागातून विद्यार्थी कुठेही कमी पडू नये यासाठी आपण विद्यालयात नवनवीन शैक्षणिक बदल व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख त्यांना करून स्पर्धा परीक्षेसाठी अधिक तयारी व्हावी यासाठी विद्यालयात क्लास मी या ॲपच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढविणार असल्याचे सांगितले. यासाठी या ॲपचे संचालक कैलास लोणारे व त्यांची सर्व टीम यांनी योग्य असे मार्गदर्शन करून त्याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. व्ही. निकम यांनी करत असताना आपल्या विद्यालयाच्या गुणवत्तेचा वाढता आलेख मांडताना विद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थी हा निश्चितच यशाचे उच्च शिखर गाठेल हे सांगताना नुकतीच मंत्रालयात वाणिज्य विभागात निवड झालेल्या सचिन विश्राम रेवगडे या माजी विद्यार्थ्यांचे उदाहरण देऊन विद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार मानतांना संस्थेचे कोषाध्यक्ष टी.के. रेवगडे यांनी विद्यार्थी घडविण्यासाठी पलकांनी वेळोवेळी आपल्या पाल्याचा अभ्यास त्याचा मागोवा घेऊन शिक्षकांशी सुसंवाद साधत राहावे असे सांगितले. यावेळी संस्थेचे सहसचिव अरुण गरगटे शालेय समितीचे चेअरमन चंद्रभान रेवगडे, पालक भगिरथ रेवगडे, नितीन रेवगडे, आशापुर माजी सरंपच विष्णू पाटोळे, सोमनाथ शेलार, मोहन पाटोळे, सुभाष जाधव, मनोज वालझाडे , भरत गुंड, संजय शिंदे ,पोपट रेवगडे ,नंदू शिंदे, अशोक रेवगडे, कविता शिंदे , सविता शिंदे ,शोभा पाटोळे, लता शिंदे, कल्पना रेवगडे, मारुती रेवगडे,विजय शिंदे, मोहन शिंदे, सुनील जाधव, किरण पवार, मीरा पवार, दीपक रेवगडे, सोमनाथ जाधव, अरुण भोर हे उपस्थित होते तसेच बी आर चव्हाण ,आर व्हि निकम, एस एम कोटकर ,आर टी गिरी ,एम एम शेख, सविता देशमुख,टि के रेवगडे,सी बी शिंदे , के डी गांगुर्डे, एस डी पाटोळे ,आर एस ढोली ,ए बी थोरे हे उपस्थित होते .