सुवर्णा दिघे,पिंपरी चिंचवड – पुण्यातील बोपखेल परिसरातून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. लहान मुले खेळत होती. खेळत असतानाच यातील एका तीन वर्षीय चिमूरडीच्या अंगावर लोखंडी गेट कोसळले. आणि या घटनेत चिमुरडीचा जागीच मृत्यू झालाय.
पिंपरी चिंचवड शहरातील बोपखेल परिसरात बुधवारी हा प्रकार घडलाय. या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही देखील समोर आला आहे.
गिरीजा शिंदे असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्या मुलीचं नाव आहे. बोपखेल येथील गणेश नगर परिसरात ते राहत होते. ३१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास गिरीजा ही चिमुकल्या मित्रांसोबत खेळत होती. हातात बाहुली घेऊन चिमुकली गिरीजा एका मैत्रिणी सोबत पळत सुटली होती. तेवढ्यात तिच्यासोबत खेळत असलेल्या मुलाने एका इमारतीच्या प्रवेशद्वारावर असणारे लोखंडी स्लाइड गेट ओढले. मात्र या गेट मध्ये बिघाड असल्याने ते गेट थेट गिरिजाच्या अंगावर पडले. भले मठे आणि वजनदार असलेले लोखंडी गेट अंगावर पडल्याचे पाहून तिच्यासोबत असणाऱ्या चिमुरड्यांनी पळ काढला आणि घरात जाऊन हा सर्व प्रकार सांगितला.
त्यानंतर मोठ्याने धावत ठेवून गेट उचलले. चिमुरडी गिरीजा वजनदार गेट खाली निपचित पडली होती. तातडीने तिला उचलून नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचा सांगितलं. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे. असं खेळत असणाऱ्या चिमुरडीसोबत भयानक प्रकार घडल्याने दुःख व्यक्त केले जात आहे. दिघी पोलीस ठाण्यात या दुःखद घटनेची नोंद करण्यात आहे