पैठण,दिं.२२: पैठण तालुक्यातील पांगरा ग्रामपंचायत कडून दिव्यांगाची दिवाळी केली गोड पांगरा शिवानी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत दिवाळी निमित्त दिव्यांग्यांना पाच टक्के निधीचे वाटप करण्यात आले . या ग्रामपंचायत अंतर्गत अकरा दिव्यांगाची नोंद केली असून या दिव्यांग्यांना निधी चेक आज दि.२१ रोजी ग्रामपंचायत सरपंच भाग्यश्री अतुल क्षीरसागर यांच्या हस्ते दिवाळीच्या निमित्ताने अकरा दिव्यांग्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे एकूण ३३ हजार रुपयांचा चेक स्वरुपात वाटप करण्यात आले या वर्षी पांगरा ग्रामपंचायत यांनी दिव्यागांना पाच टक्के निधी वाटप करुन दिवाळी केली गोड चेक घेताना दिव्यागाचा चेहर्यावर हास्य अनंद दिसून आले यावेळी ग्रामविकास अधिकारी बबनराव हलगडे, उपसरपंच तय्युब पठाण, युवा नेते अतुल क्षीरसागर, माजी सरपंच प्रकाश नाना क्षीरसागर , अशोक काळे, ताराबाई क्षीरसागर, रशिदाबी पठाण, वच्छलाबाई लाडा, सुलतानाबी शामद शेख, सुदाम आदमाने ,रमेश खाटिक, तसेच पांगरा येथील प्रतिष्ठित नागरिक व गावातील नागरिक उपस्थित होते.