पैठण,दिं.१७ : पैठण येथील महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे माजी नगराध्यक्ष तथा संभाजीनगर जिल्ह्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज राजेंद्र लोळगे यांना मराठवाडा रत्न पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
सदरील पुरस्कार मराठवाडा सेवक प्रतिष्ठान पुणे व्दारा सुरज लोळगे यांना मराठवाडा रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.