देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
दोन दिवसापासून घरातून बेपत्ता असलेल्या बाबासाहेब गुंड या ६४ वर्षीय इसमाचा मृतदेह आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी माहेगाव परिसरातील प्रवरा नदी पात्रात आढळून आल्याने या परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
बाबासाहेब मुरलीधर गुंड, वय ६४ वर्षे, राहणार लाख, ता. राहुरी. हे गेल्या दोन दिवसापासून घरातून बेपत्ता होते. आज सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान राहुरी तालूक्यातील माहेगाव परिसरात एक इसम प्रवरा नदीपात्रात मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आला. परिसरातील काही तरूणांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यावेळी तो मृतदेह बाबासाहेब गुंड यांचा असल्याचे समजले. मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाबासाहेब गुंड हे पाण्यात बुडून मयत झाल्याचे राहुरी पोलिस ठाण्यात कळवीले.
त्यानूसार राहुरी पोलिस ठाण्यात आमृ. रजि. नं. १९३/२०२२ सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेश भवार हे करीत आहेत.