सातारा/अनिल वीर : जिल्हा भारतीय बौद्ध महासभा (पूर्व विभाग) यांची महत्वपूर्ण सहविचार सभेचे आयोजन बुधवार दि.१७ रोजी सकाळी ११ वा.डॉ.आंबेडकर भवन,आंबेडकर नगर,कोरेगाव येथे आयोजीत करण्यात आली आहे.अशी माहिती जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोहिते यांनी दिली.
सदरच्या सभेस पदाधिकाऱ्यांनी सल्ला मसलत करून वेळेवर उपस्थित रहावे. जिल्हा पदाधिकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरेगाव तालुक्याची नवीन कार्यकारिणीचे पुनर्गठण करण्यात येणार आहे.जेव्हा आपल्या तालुक्यातील इच्छुक सर्व आजी-माजी कार्यकर्ते,केंद्रीय शिक्षक – शिक्षिका, बौद्धाचार्य आदिना उपस्थित राहण्यासंदर्भात कार्यवाही करावी.तालुका पुरुष कार्यकारिणी बरोबरच तालुका महिला कार्यकारिणीचीही नियुक्ती करण्यात येणार आहे.तेव्हा महिलाही अधिकाधिक महिला देखील उपस्थित राहतील याची दक्षता घ्यायची आहे.तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी यांनी
जिल्हा शाखेस अवगत करावे. असे आवाहन नानासाहेब मोहिते, बाळासाहेब जाधव,अनिल कांबळे आदींनी केले आहे.