उरण दि १३(विठ्ठल ममताबादे ) : निसर्गाचे, पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व्हावे, पर्यावरण संरक्षण विषयक जनजागृती व्हावी या अनुषंगाने दिनांक १३/७/२०२४ रोजी भेंडखळ ग्रामपंचायतच्या वतीने ठाणकेश्वर मैदान येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमास भेंडखळ ग्रामपंचायतच्या सरपंच मंजीता पाटील, उपसरपंच अक्षता ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या प्राची ठाकूर,ग्रामपंचायत सदस्य दिपक ठाकूर, अजित ठाकूर ,लिलेश्वर भगत , अभिजीत ठाकूर,ग्रामपंचायत सदस्या संगीता भगत, सोनाली ठाकूर,प्राची ठाकूर ,शितल ठाकूर ,स्वाती घरत ,स्वाती पाटील, ग्रामविकास अधिकारी किरण केणी, ग्रामपंचायत वरिष्ठ लिपिक दिपाली मते,ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका, भेंडखळ गावातील नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विविध प्रकारचे झाडे लावून कार्यक्रम यशस्वी केला.या कार्यक्रमातून झाडे वाचवा, झाडे जगवा, पर्यावरणाचे संरक्षण करा,पर्यावरणचे संवर्धन करा असा संदेश देण्यात आला.