मराठी चित्रपट निर्मात्यांनी आपल्या निष्क्रियतेचे खापर प्रेक्षक आणि थेटर मालकांवर फोडू नये

0

मुंबई – खरं तर भारतातील पहीला सिनेमा महाराष्ट्रातील दादासाहेब फाळकेंनी केला आणी भारतीय सीनेसृष्टी जन्माला आली. फार पुर्वी पासून नाही पण सत्तरच्या दशकापासून राजा गोसावी, दादा कोंडके, निळू फुले, श्रीराम लागू अरून सरनाइक, रंजना, उषा चव्हाण, अलका कुबल अशी कितीतरी मोठे कलाकार त्या काळी मराठी सिनेसृष्टी ला लाभले आणी कितीतरी मराठी सिनेमांनी सिल्व्हर जुबली गोल्डन जुबली चा मान मिळवला. सामना, वजीर, माहेरची साडी अशी ही बनवा बनवी, धुमधडाका सिनेमे आजही लोक पुन्हा पुन्हा पाहतात तसेच कितीतरी मराठी सिनेमांचा रीमेक हिंदी सह इतर भाषेत झालेले आहेत. अगदी अलीकडच्या काळातील श्वास सारख्या मराठी सिनेमा वेगळया कलाकृतीने हिंदी फिल्म इंडस्ट्रीने श्वास रोखून धरला होता तर नटरंग, जोगवा, नटसम्राट, लय भारी दुनियादारी, सैराटच्या यशाने मराठी सिनेमांची धास्ती घेवून हींदी सिनेमांच्या रिलीज च्या तारखा बदलल्या होत्या. मग असा गौरवशाली इतीहास असणाऱ्या मराठी सिनेमांची आत्ताच पडझड का चालू आहे.

अलीकडेच मराठी चित्रपटाची निर्मिती मोठ्‌या प्रमाणात होत असली तरीही अनेक मराठी चित्रपट निर्मितीनंतर सुद्धा चित्रपटगृह मिळत नसल्याची ओरड सातत्याने करतात. साहजिकच चित्रपट निर्मितीनंतर आशावादी असलेल्या निर्मात्याला ज्यावेळी चित्रपट निर्मितीनंतर लावलेला पैसे कलेक्शन करण्याची गरज असताणां अशा वेळेस मात्र थेटर मालकांकडून चित्रपटगृह मिळत नाहीत आणि चित्रपटगृह मिळाले तर प्रेक्षक मिळत नाहीत ही दयनीय अवस्था मराठी चित्रपटांची आहे. असं का होते? यावर अद्यापही कोणीही कुठल्याही प्रकारचा विचार केलेला दिसत नाही. त्यामुळेच शोकांतिकासह म्हणावे लागते की मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे आणि अस असेल तर ही खरच येणाऱ्या काळात धोक्याची घंटा आहे. त्या करिता खोलवर विचार करणे गरजेचे आहे. जर केला तर चित्रपटगृह का मिळत नाहीत, याबाबत अद्यापही असे स्पेशल सेशन मार्गदर्शन कुठेही दिल्या गेलं नाही. नुकतेच एका निर्मात्याने इमोशनल होऊन, “मराठी सिनेमा संपवला जातोय” असे अश्रू अनावर होऊन हात जोडत भावनिक व्हिडिओ शेअर केला होता.

अनेकदा सिनेमा चांगला असूनही शो मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर होतात. दरम्यान मराठी सिनेमा संपवला जात आहे. खरंच अशी परिस्थिती आली आहे का? आता या पुढे सिनेमा करण्याची इच्छा नाही, अशी भूमिका अनेक निर्माते यांनी घेतली आहे. असे अनेक निर्माते आहेत जे सिनेमा करायचा म्हणून करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेस चुकीच्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे लाखो रुपयाची त्यांची फजगत होते आणि शेवटी अशी निर्माते आपल्या चुकीच्या कृतीमुळे फसल्यामुळे त्याच खापर मात्र मराठी चित्रपट इंडस्ट्रीवर फोडतात. हे कितपत
[16/5, 9:30 PM] JAY GURU DEV: योग्य आहे? सिनेमा निर्मिती करत असताना सिनेमाचा खरा हिरो ही कथा असते, मात्र कथेवर काम करताना कुठलाही नवीन निर्माता दिसत. उलट दिग्दर्शकांनी केलेल्या मोठ्या मोठ्या आर्थिक गणितांना फसून अवास्तव पैशांची लय लूट करते आणि मग मात्र त्यात त्याची रिकवरी झाली नसेल तर तो मात्र त्या दिग्दर्शला आणि मराठी चित्रपट क्षेत्राला शिवी देऊन या क्षेत्रापासून फारकत घेतो. असं का घडते याच्यावर विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान अलीकडच्या काळात ज्या ठिकाणी मराठी सिनेमाचा शो लागल्यानंतर काही थेटर मालकांकडे चौकशी केल्यानंतर सिनेमाला एका आठवड्यात कुठेही बुकिंग व्यवस्थित नसल्याचे दिसून आले. डिस्ट्रीब्यूटर चे रिपोर्ट चेक केले तर दिवसाला एक शो ला दहा पंधरा वीस अशी तिकीट विक्री झाल्याचे आमचे निदर्शनास येते मग विचार करा एवढ्या तिकिटांमध्ये त्या थेटर मालकांचे एसीचे किंवा तिथे काम करणाऱ्या पाच-दहा मुलांचे दिवसाचा पगार देखिल निघू शकत का? अशा परिस्थितीमध्ये थेटर मालकाच्या बाजूने देखील विचार केला पाहिजे. मग आपण विचार करा की जर सिने निर्माते दर शुक्रवारी कमीत कमी पाच ते दहा सिनेमे हे रिलीज करत असतील तर मोठ्या प्रमाणावर निर्मात्यांना आणि थेटर मालकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते, कुठला सिनेमा घ्यायचा त्या सिनेमाला किती शो द्यायचे, यामध्ये थेटर मालकांची मोठी कसरत होत असते. हा देखील विचार आपण केला पाहिजे, दरम्यान मराठी चित्रपटाच्या निर्मितीनंतर सिनेमे प्रसिद्धीतच मार खातात याचे अनेक उदाहरणे आहेत. सिनेमाची निर्मिती करताना उत्कृष्ट कथा / गीत, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट मांडणी चित्रपटाची असेल तर सिनेमे थेटर मालक सुद्धा सिनेमे घेताना रांगेत उभे असतात. याची अनेक उदाहरणे मराठी सिनेमा बाबतीत आपण अनेकदा बघितली आहेत. त्या तुलनेत हिंदी चित्रपट किंवा साउथच्या सिनेमांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी असल्याची ओरड सातत्याने होते. मात्र आपण कधी हा विचार केला आहे का? की साउथ चे सिनेमे हिंदी सिनेमेची लाखोचे बजेट असतात, सोबत ते प्रसिद्धी मोठ्या प्रमाणत करतात. तसेच सिनेमा दर्जेदार असेल तर त्याला प्रेक्षक आवर्जून उपस्थित राहतात, यात तीळ मात्र ही शंका नाही. त्यामुळे ओरड करण्यापेक्षा यातून काही शिकता आल तरच खऱ्या अर्थाने थेटर मालक सुद्धा आपल्या सिनेमांना न्याय देतील ही अपेक्षा व्यक्त करण्यास संयुक्तिक ठरेल. उदाहरण झालं तर प्रसिद्धीचा भाडीमार केलेल्याच सैराट सिनेमा तुफान गर्दीत चालला जेव्हा की चित्रपट दिग्दर्शक आणि कलाकार सुद्धा नवीन होते तरीसुद्धा मराठी सिनेमासाठी तासन्तास रांगा लागून होत्या हेही आपण अनुभवल आहे…

जर सिनेमाची निर्मिती करतानाच मार्केटिंगचा विचार जर केला तर सिनेमा थेटरला चालताना कुठल्याही अडचणींना समोर जाण्याची गरज पडत नाही, मात्र मराठी चित्रपट निर्मात्यांना अनेकदा चित्रपट निर्मितीनंतर वितरणाचा आणि मार्केटिंगच्या अतिशय महत्त्वाच्या समस्येला समोर जावे लागते. कारण वितरण आणि मार्केटिंग साठी मराठी चित्रपट निर्मात्याकडे बजेटच नसल्यामुळे नाईलाजास्तव सिनेमे चांगले असताना सुद्धा ते खऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यामुळे प्रेक्षक त्या सिनेमापर्यंत येत नाहीत ही बाब पण आपण सर्वानी मान्य केली पाहिजे. चित्रपट निर्मिती करत असताना प्रेक्षकांच्या चॉईस प्रमाणेच चित्रपटाची निर्मिती झाली तर चोखंदळ असलेला प्रेक्षक हा सातत्याने आपल्या सिनेमाकडे प्रामुख्याने हजर राहील आणि जर सिनेमा चांगला नसेल तर निश्चितच त्या सिनेमाला प्रेक्षक येणार नाही. त्यामुळे प्रेक्षकावर आपल्या निष्करित्याचं खापर फोडणे हे कितपत योग्य आहे. मराठी हिंदी किंवा कुठलेही भाषेतील चित्रपट हा प्रेक्षकांच्या मनोरंजनचे साधन तर आहेच सोबत प्रचाराचे उत्कृष्ट माध्यम आहे. त्यामुळे मराठी सिनेमा संपवला जात आहे. असं म्हणणं मुळात चुकीचा आहे. निर्मात्याने जितकी थेटर आपल्याला मिळाली आहेत. ती थेटर खऱ्या अर्थाने भरली आहेत का याचे सुद्धा संशोधन करणे गरजेचे आहे. आपल्या निष्क्रियतेचा मराठी प्रेक्षकांवरती खापर फोडण्याचा अधिकार कोणालाही नाही. आपल्या सिनेमात ती ताकद असली पाहिजे की ज्याच्यासाठी मराठी प्रेक्षक हा घरातून सिनेमा बघण्यासाठी निघालाच पाहिजे.

याच महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या फळीतील लोकांच्या सिनेमांच्या गोल्डन व सिल्व्हर जुबली साजरा केली आहे. मराठी चित्रपटाला दर्जेदाराच्या श्रेणीत आणण्यासाठी महाराष्ट्र शासन सुद्धा आर्थिक मदत करून त्यांना परत सिनेमा काढण्यासाठी प्रोत्साहित करते पण शासनाकडून मिळणारी ही मदत सुद्धा इतर राज्यांच्या तुलनेत तुटपुंजी आहे. त्याचप्रमाणे या समितीवर काम करणारी अनेक अशी लोक आहेत की ज्यांचं तीळ मात्र ही चित्रपट क्षेत्राशी संबंध नाही आणी अशी स्टार मंडळी आहे की ज्यांना निर्मात्याच्या आर्थिक परिस्थितीशी काही देणं नाही. पण ग्रामीण भागातल्या निर्मात्याचा अडचणी समजून घेण्यासाठी या समितीवर ग्रामीण भागातल्या सुद्धा निर्मात्यांची वर्णी लगाणे इतकाच महत्त्वाचा आहे. उगाच प्रत्येक वेळी मराठी निर्माते व दिग्दर्शक उठतात आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नाव ठेवतात है खरंतर चुकीचे आहे. महाराष्ट्रातील आपला मराठी प्रेक्षक हा खूप सुज्ञान आणि हुशार आहे त्यांना कुठल्याही, प्रकारे सांगायची गरज पडत नाही हाच तो प्रेक्षक राजा आहे त्यांनी जर ठरवलं तर एका दिवसात स्टार करते आणि एका दिवसात जमिनीवर सुद्धा आणते याची माहती ज्यांना समजले तोच या क्षेत्रात टिकतो.

बाबासाहेब पाटील प्रदेशाध्यक्ष- राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here