मुख्य मुद्द्यांवर कोणीच बोलेना ः जनतेचे मुद्दे गायब, महागाईला बगल; फुकट योजनांभोवतीच दोन्ही पक्षांची प्रचार मोहीम
नांदेड प्रतिनिधी (मारोती सवंडकर)
लोकसभेला संविधानात बदल, आरक्षणाला धोका असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केल्याने व मराठा आरक्षणावर सताधारी नेमहाराष्ट्रात महायुतीला फटका बसला. परंतु, विधानसभा निवडणुकीत मात्र लोकसभेतील बहुतांश मुद्दे तगातयब झाले आहेत. यावेळी लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि लाडका शेतकरी या मुद्यांभोवतीच निवडणुकीची प्रचार मोहीम फिरत आहे.
मतदारांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून राममंदिर, कलम ३७०, रस्ते, मेट्रोचे जाळे या मुद्यांवर जोर दिला गेला. तसेच विरोधकांना देशद्रोही मंडळींचा समूह म्हणून हिणविले होते. तर इंडिया आघाडीकडून संविधानाला धोका महागाई, बेरोजगारी, आरक्षण संपविणार, उद्योगधंदे गुजरातला पळविले, मणिपूर या मुद्यांवरून प्रचाराची राळ उडविण्यात आली होती. त्यात संविधानाला धोका या मुद्यावर आघाडीने अधिक भर दिल्याने महायुती बॅकफूटवर गेली होती.
यावेळी मात्र लोकांचे महत्वपूर्ण प्रश्न असलेल्या महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला भाव या मुद्यांना मात्र सोयीस्करपणे बगल देण्यात आल्याचे दिसून येते. एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेकीमुळे मुख्य मुद्द्यांवर कोणीच बोलेना असे चित्र आहे परंतु शाश्वत व दुरोगामी परिणाम करणारे धोरणात्मक निर्णय नाही झाले तर राज्याच्या प्रगतीचे चाकं रुतणार त्याचबरोबर सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागणार अशी शक्यता नाकारता येत नाही
विधानसभा निवडणुकीत यावेळी भाजपकडून लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांऐवजी २१०० रुपये देणार,युवकांच्या हाताला काम, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ, महाराष्ट्रात गुंतवणूक वाढली, शेतकरी सन्मान निधीत वाढ, महिलांना एस.टी. प्रवासात सवलत, ओबीसी, एससी, एसटी आरक्षणाला धोका या मुद्यांवर प्रचारात जोर देण्यात येत आहे.
महाविकास आघाडीनेही त्याला उत्तर म्हणून लाडक्या बहिणींना दरमहा तीन हजार रुपये देणार, जातनिहाय जनगणना, महिलांना मोफत प्रवास, भ्रष्टाचार, जाती धर्मात तेढ, आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे नेणार हे मुद्दे मतदारांसमोर मांडले आहेत.
महायुती व महाविकास आघाडीकडून मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी नवनवे मुद्दे उकरून काढले जात आहेत. परंतु, या सर्वांमध्ये वाढत असलेली महागाई, बेरोजगारी, भरती परीक्षांतील घोटाळे, शेतकरी आत्महत्या, आरोग्य व्यवस्था अशा जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांना मात्र कुणीही हात घातला नाही. उलट, एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करण्यातच धन्यता मानली जात आहे.
जाहीरातींमुळे गाजलेली निवडणुक ः रिल्स् चा जमाना
येत्या दोनच दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभा मतदानाचा दिवस आहे. यावेळी सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकांवर असलेल्या महाविकास आघाडीच्या विविध माध्यमांत अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या. एकेकाळी विचारपूर्वक आणि सौंदर्यदृष्टी वापरून केलेल्या अर्थपूर्ण जाहिराती मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत. यावेळी मात्र काही अपवाद सोडल्यास अश्लाघ्य भाषा, असभ्य ताशेरे, सौंदर्यदृष्टीचा अभाव आणि वाचाळ अभिव्यक्ती यांचाच बुजबुजाट पहायला मिळत आहे यावरून पुढील काळात सुसं्कृत महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीची दिशा काय असेल हेही अनाकलनिय असणार आहे ..