फलटण प्रतिनिधी श्रीकृष्ण सातव
बुधवार दि. 2 नोव्हेंबर रोजी शिक्षण संचालक कार्यालय, पुणे येथे महाराष्टू पेन्शनर्स असोसिएशन तर्फे लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले . या मधे प्रामुख्याने नगर व पुणे जिल्हयाचे पेन्शनर्स मोठ्या संखेने उपस्थित होते.इतर जिल्ह्यातून कांही प्रतिनिधी उपस्थित होते . मा . संचालक व उपसंचालक यांनी उपोषण कर्त्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन स्विकारले अपुरा निधी प्राप्त झाल्या बद्दल लेखी पत्र शिखर संघटनेचे अध्यक्ष मारणे यांच्या कडे दिले . सदर पत्राचा पाठपुरावा मंत्रालय स्तरावर करण्यात येईल असे अध्यक्ष एन.डी. मारणे यांनी सांगितले . सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत हे आंदोलन पार पडले .
सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये पुढील मागण्या आहेत.
1) दरमहाची पेन्शन दर महिन्याच्या 10 तारखेपूर्वी व्हावी.
2) प्रत्येक जिल्ह्याला पेन्शन व फरक बीलांसाठी त्यांच्या आवश्यक मागणीनुसार पुरेसे अनुदान मिळावे.
3) 7 व्या वेतन आयोगाचा 3 रा हप्ता अजूनही बऱ्याच जिल्ह्यात अपुऱ्या अनुदानामुळे दिला गेला नाही.
4)न्यायालयाचा निकाल लागूनही दि.1/7/1972 नंतर सेवेत रुजू झालेल्या काही अप्रशिक्षित सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन चालू झाली नाही.
5)इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्राचे वैद्यकीय भत्ता देण्याची तरतूद लागू करण्यात यावी.उपस्थितांमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष.ठुबे,सरचिटणीस .उबाळे पुणे जिल्ह्याचेअध्यक्ष व म.पे.अ.चे कार्याध्यक्ष वाबळे महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे सरचिटणीस लक्ष्मण टेंबे, कोषाध्यक्ष श्रीम.अपर्णाकुलकर्णी, समाचार अंकाचे संपादक आप्पा कुलकर्णी व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातून सुमारे 400 चे आसपास सेवानिव्रुत्त कर्मचारी उपस्थित होते.तसेच बीड,अकोला, जळगाव, नांदेड, नाशिक, रायगड जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.