येवला प्रतिनिधी….
नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील,विविध शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने करून ५० वर्ष संघर्ष करत आलेल्या मांजरपाडा प्रकल्प २५ ते ३०० मिलिमीटर पाणी गुजरातमध्ये वाहून जाते,ते पाणी नाशिक जिल्ह्यात वळवण्यासाठी मांजरपाडा येथे वळण बंधारा बांधुन तब्बल १० किलोमीटर बोगदा करून १६५ किलोमीटर कालवा तयार करून, हेच पाणी ओणंदा नदीतून दरसवाडी कालव्या मार्फत पेठ,सुरगाणा,चांदवड, निफाड,दिंडोरी,येवला,वैजापूर येथे जाऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याने या प्रकल्पाला महत्व प्राप्त झाले आहे,मात्र अनेक वर्षे लोटली मात्र कोट्यवधी रुपये खर्च होऊनही, काही भाग वगळता इतर ठिकाणी अद्यापही या प्रकल्पाचे काम पूर्ण नसल्याने शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे व राजकारण केले जात आहे .
म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या नाशिक महिला उपजिल्हाध्य रोहिणी वाघ,नाशिक जिल्हा पूर्व कार्याध्यक्ष आर.के. मामा,उपजिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष दिनकर चव्हाण,चांदवड तालुका अध्यक्ष समाधान आहेर, ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनचे चांदवड तालुका अध्यक्ष सूर्यकांत जाधव,यांच्यासह पुष्पा पवार जितेंद्र कोतवाल,सुदर्शन खंगाळ,जालिंदर कदम,विकास जाधव,पुंडलिक,घोरपडे,शब्बीर शहा आदी पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन या कालव्याच्या तत्सम कामात व मंजूर असलेले अस्तरीकरण यात मोठया प्रमाणावर अनीयमीतता,व अनेक ठिकाणी कमी अधिक रुंदीकरण आणि ते काम अंदाजपत्रका नुसार होत नसल्याने शासनाची दिशाभूल केली जात आहे. यासाठी जनजागृती केली आहे. व शासनाच्या वतीने त्वरीत दखल घेऊन या प्रकल्पाची उच्च स्तरीय चौकशी करावी व कामात अडथळा निर्माण करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी.व प्रकल्पाचे काम अंदाजपत्रका नुसार युद्ध पातळीवर पूर्ण करावे म्हणून,अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि.२७ ऑक्टोंबर २०२३ रोजी संबधीत मुद्दा लक्षवेधी करण्यासाठी चांदवड तहसील कार्यालयावर संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांसह चांदवड येथील मातोश्री मंगलकार्यालय,खंडेराव चौफुली येथून बैलगाडीवर रॅली काढून निदर्शने करत शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर,प्रदेश युवती अध्यक्ष सना शेख प्रदेश नियंत्रण समिती अध्यक्ष हितेश दाभाडे,विभागीय महिला अध्यक्ष सारिका नागरे,नाशिक जिल्हा महिला कार्याध्यक्ष निर्मला बुल्हे,नाशिक ब्रिक्स जिल्हाध्यक्ष गिरीश गावीत,नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष याकुब शेख,ब्रिक्स महिला जिल्हाध्यक्ष माधुरी गायकवाड,नाशिक संपर्क प्रमुख सुरेश बढे.येवला तालुका अध्यक्ष सुनील जाधव, लासलगाव शहर अध्यक्ष किरण थोरात,
.