उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन निधीतून बांधण्यात आलेल्या रानसई खोंड्याची वाडी अंगणवाडीचे उदघाट्न सोहळा माजी आमदार मनोहरशेठ भोईर हस्ते व उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनाकं 20/10/2022 रोजी संपन्न झाला.यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर व तालुकाप्रमुख संतोष ठाकूर म्हणाले की, शिवसेनेच्या माध्यमातून ही सर्व विकास कामे या दुर्गम भागात होत आहेत तरी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीत भगवा झेंडा फडकवून आपल्या वाडीतील उर्वरित विकास कामे करून घ्यावीत व सदैव शिवसेने सोबत राहावे असे आवाहन केले.
या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख संदेश पाटील,उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, कु कोमल भोईर,प्रफुल म्हात्रे, पी डी घरत, प्रकाश म्हात्रे,सरपंच सौ भगतताई, गणपत शिनगा, शिवसेना शाखा रानसई चे पदाधिकारी दीपक लेंडे, बाळाराम खंडवी, आयत्या दोरे, भास्कर बांगारी,मधु वीर, दिनेश बांगारी, पद्माकर वीर, रामा पारधी, मोहन उघडा, महादेव बांगारी, नरेश भल्ला, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ व विध्यार्थी उपस्थित होते.