माजी आमदार स्व विनायक मेटे यांचा दशक्रिया विधी पैठण येथे संपन्न.

0
  • पैठण,दिं.२३ : मराठा आरक्षण संघर्ष योद्धा माजी आमदार स्व. विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा दशक्रिया विधी पैठण येथील नाथ मंदीराच्या मागील मोक्ष घाटावर मंगळवार दिं.२३ रोजी सकाळी नऊ वाजता संपन्न झाला. मराठा संघर्ष योद्धा माजी आमदार स्व. विनायकराव मेटे यांच्या दशक्रियाविधीसाठी दक्षिण काशी पैठण येथील मोक्षघाटावर हजारो संख्येने चाहत्यानी गर्दी केली होती .    दहा दिवसापूर्वी मराठा आरक्षण संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या मिटींगला मुंबई येथे जात असताना माजी आमदार स्व. विनायकराव मेटे यांच्या वाहनाला मुंबई एक्सप्रेस हायवे वर अपघात झाला होता. या अपघातात मराठा संघर्ष योद्धा विनायकराव मेटे यांचे निधन झाल्याची वार्ता संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्यामुळे शिवसंग्राम संघटनेच्या परीवारासह सर्व क्षेत्रातील मंडळींना व त्यांच्या नातेवाईकांना अचानक धक्का बसला होता. मंगळवारी दि.२३ रोजी सकाळी  नऊ वाजता श्रीक्षेत्र पैठण येथील दक्षिणकाशी असलेल्या मोक्षघाटावर त्यांचे पुत्र आशुतोष मेटे, मुलगी आकांक्षा, पत्नी ज्योतीताई, भाऊ त्रिंबक मेटे, रामहरी मेटे,मेव्हणे झारखंडचे डीआयजी संजय लाटकर, नितीन लाटकर यांनी  पुरोहित गर्गे देवा यांच्या मंत्र घोषात दशक्रिया विधी पार पडली. यावेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण, आमदार भीमराव धोंडे,आन्नासाहेब जाधव, काकासाहेब देशमुख,जालींदर उभेदळ पाटील, उत्तमराव काकडे, गणेश निवारे, मुरली पोकळे, गणेश कुमावत, बाबुराव पवार,सलीम पटेल, संभाजी काटे , पत्रकार गजानन आवारे पाटील, दादासाहेब पठाडे,छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील काळे,गोरख पठाडे, धनंजय शिंदे, उमेश जाधव, संदीप लोहारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वर्गीय विनायकराव मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी महाराष्ट्रातील शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सह नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here