माझी अडचण असेल तर मी बाजूला होतो पण लोकशाहीर आण्णा भाऊंच्या स्मारकाचे उद्घाटन करा -आ. आशुतोष काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरात उभारलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे शासकीय उद्घाटन व्हावे अशी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा समिती सदस्य व तमाम समाज बांधवांची इच्छा आहे. मात्र हे उद्घाटन केले जात नाही. या उद्घाटनासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या ठिकाणी माझी गरज भासणार आहे त्या ठिकाणी मी सर्वोतोपरी मदत करण्यास तयार होता आणि यापुढे देखील राहील. मात्र साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय अनावरण लवकरात लवकर करावे. माझी काही अडचण होत असेल तर मी बाजूला होतो परंतु समाज बांधवांच्या भावनांचा विचार करून लवकरात लवकर शासकीय उद्घाटन व्हावे अशी भावना आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केली आहे.

           

वंचितांचा बुलंद आवाज होऊन आपल्या धारदार लेखणीतून व गीतांमधून अन्यायाची जाणीव करून देत अन्यायाविरोधात लढण्यासाठी प्रेरणा देणारे थोर प्रतिभावंत साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक समितीची मागणी आहे की, स्मारकाचे लवकरात लवकर उद्घाटन व्हावे. त्यासाठी स्मारक समितीच्या सर्व सदस्यांनी स्मारकाचे उद्घाटनाबाबत सर्वानुमते ठराव करून कोपरगाव नगरपरिषदेकडे द्याबा. त्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने कोणत्याही प्रकारची मदत करण्यास मी सदैव तयार आहे. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या आदर्श विचारांवर आपण सर्व वाटचाल करत आहोत. त्यांच्या विचारांची शिदोरी घेवून पुढे जात  असतांना त्यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे आपले कर्तव्य आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम पूर्ण होवून देखील स्मारकाचे उद्घाटनाबाबत नेमक्या काय अडचणी आहेत, कशामुळे स्मारकाचे उद्घाटन थांबले आहे याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. माझी अडचण येत असेल तर मी बाजूला होतो पण लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लवकरात लवकर उद्घाटन करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here