बारामती: माळेगाव तालुका बारामती पोलीस स्टेशन हद्दीतील आगामी गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व दहीहंडी संघ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी – कार्यकर्ते, पत्रकार, हिंदू – मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांची माळेगाव बु नगरपंचायत हद्दीतील श्री मोरया मंगल कार्यालय येथे शांतता बैठक पार पडली.
या बैठकीस उपस्थित सर्वांना किरण अवचर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी, माळेगाव पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांनी आगामी सर्व सण उत्सव शांततेत पार पडणेसाठी महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमांची माहिती देऊन नियमांचे तंतोतंत पालन करण्याबाबत, मंडळाचे वतीने घेण्यात येणारे देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम वेळेत संपविणे तसेच विसर्जन मिरवणुकी बाबत योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच गतवर्षी सन 2022 मध्ये नवनिर्मित माळेगाव पोलीस स्टेशन कडून पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळ जे स्थापना व विसर्जन मिरवणूक कार्यक्रम हे पारंपरिक वाद्यामध्ये काढतील, गुलाल ऐवजी फुलांचा वापर करतील, तसेच सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य रक्तदान शिबिर, वृक्षारोपण असे कार्यक्रम राबविणारे एकूण 5 सार्वजनिक गणेश मंडळांना श्री गणराया पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले होते, या आवाहन ला प्रतिसाद देऊन सन 2022 मध्ये चांगल्या प्रकारे कार्य करणाऱ्या खालील गणेश मंडळांना श्री गणराया पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे.
1) प्रथम क्रमांक – श्री गणेश सार्वजनिक एक गाव एक गणपती मंडळ, नेपतवळण
अध्यक्ष निलेश बाळासाहेब जाधव
2)द्वितीय क्रमांक – श्री अष्टविनायक मित्र मंडळ विक्रम नगर माळेगाव बुद्रुक नगरपंचायत अध्यक्ष रहीमान गुलाब भाई शेख
3) तृतीय पुरस्कार – श्री आदलेश्वर युवा मंच, बाजारतळ, पणदरे अध्यक्ष ऋतुराज मोहन ननवरे
उत्तेजनार्थ बक्षिसे-
1) श्री.छ.संभाजीराजे प्रतिष्ठान संभाजीनगर माळेगाव बुद्रुक नगरपंचायत
अध्यक्ष अमित विजयराव तावरे
2) श्री अमर शिवाजी तरुण मंडळ मारुती चौक कांबळेश्वर
अध्यक्ष विराज धैर्यवान खलाटे आदी मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रम आयोजित केले बद्दल माळेगाव बुद्रुक शहरातील श्री.दत्त सार्वजनिक गणेश मंडळ पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते निशिगंध तावरे, श्री अष्टविनायक मित्र मंडळाचे रहीमान भाई शेख यांनी माळेगाव पोलीस स्टेशन आयोजित उपक्रम बद्दल आभार मानून सर्व मंडळ पदाधिकारी यांना चांगल्या प्रकारे गणेश उत्सव साजरे करणे बद्दल आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप गोपनीय विभाग, माळेगाव पोलीस स्टेशन यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र तावरे पोलीस पाटील, मौजे सांगवी यांनी मानले.