पुणे : परतीच्या पावसाने पुणे शहर आणि परिसराला सोमवारी रात्री अक्षरशः झोडपून काढले आहे या पावसाने पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. तर पुणे शहरातील रस्त्यानं जणूकाही नदीचे स्वरूप आले होते . रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह एव्हढा जोराचा होता की त्यामध्ये अनेक मोठी वाहनेही वाहून गेली . तर अनेक घरांमध्ये तसेच दुकानामध्ये पाणी शिरल्याने प्रचंड मोठे नुकसान झाले. सोमवारी मुसळधार पावसाने काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे आणखीच हाल झाले. पुण्यात मुसळधार पावसाने दारोदारी झालेल्या ‘जलयुक्त शिवारा’साठी कोण जबाबदार आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत.
पुण्यात झालेल्या या पावसाने शहर नियोजनाच्या मर्यादा उघड झाल्याने पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे. स्मार्ट सिटी असणाऱ्या पुणे शहराची अशी दयनीय अवस्था का, असा सवाल पुणेकरांनी उपस्थित केला आहे. पुण्यात नवीन बांधकाम उभारण्यासाठी नदी पात्र बुजवणे, टेकडी तोडणे, ओढे बुझवणे आदी कामे करण्यात आली. त्याचा परिणाम पावसात दिसून आला. पर्यावरणाचा ऱ्हास करून केलेल्या कथित विकासाची किंमत मोजावी लागत असल्याची भावना पुणेकरांनी व्यक्त केली आहे. पुण्यात ही स्थिती ओढावू नये यासाठी ठोस पावले उचलण्यात यावी अशी अपेक्षाही पुणेकरांनी व्यक्त केली आहे.
राज्यात परतीचा पाऊस सुरू झाला आहे. या परतीच्या पावसाने पुण्यालाही तडाखा दिला. शिवाजी नगर परिसरात रात्री साडे अकरा वाजेपर्यंत ८१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्याच वेळेस या पावसाने स्मार्ट सिटी पुणेच्या शहर नियोजनाच्या मर्यादा उघडकीस आणल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात काही ठिकाणी पाणी साचले होते. मात्र, सोमवारी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले. येवलेवाडी स्मशानभूमीजवळ, सुखसागर नगर, अंबामाता मंदीर, कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड, रस्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ, डॉल्फिन चौक, बी.टी. कवडे रोड अग्निशमन केंद्र परिसर, हडपसर परिसरात पाणी साचले होते.