लोहारा ( ता . प्र ) शहरातील मुस्लिम समाजाचे सांस्कृतीक संभागृह वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्याच्या नोंदीचे कागद पत्र गायब असून त्यात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत त्याची चौकशीची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याबात अधिक माहिती अशी की लोहारा शहरामध्ये माजी राज्यमंत्री बस्वराज पाटील यांच्या निधीतुन सन २००३ / ४ मध्ये स .न ११८ मध्ये शहरातील मुस्लीम समाजासाठी सांसकृतीक सभागृह बांधुन देण्यात आले .परंतु त्यांनतर त्याच्या रखरखावाकडे लक्ष न दिल्याने सभागृहाची दुरावस्था झाली होती .
त्यांनतर वेळोवेळी विनंती केल्यानंतर दुरुस्तीसाठी आमदार / खासदार निधीतुन निधी मिळावा या हेतूने माजी नगरसेवक शामसुंदर नारायनकर यांनी मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय येथे रितसर अर्ज करून संबधीत सभागृहाचे कागदपत्राणी मागणी केली. परंतु सदर सभागृहाचे कागदपत्र उपलब्ध नाही म्हणुन लेखी पत्र देण्यात आले. त्यामुळे तहासिलदार लोहारा यांनी सदर सभागृहाची मोजनी करून ७ / १२ व ८ आ नोद करण्याचे आदेश करण्यात यावे असे मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर माजी नगरसेवक शामसुंदर भीमराव नारायणकर, महेबुब फकीर आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत या निवेदनाच्या प्रति तहसिलदार लोहारा ,जिल्हा अधिकारी धाराशिव , जिल्हा नियोजन समिती धाराशिव ‘ सार्वजनिक बांधकाम विभाग लोहारा , मुख्याधिकारी लोहारा यांना देण्यात आले आहे