माहूर :- दहावी च्या परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी जात असलेल्या होमगार्ड च्या दुचाकी ला रानडुक्कराने जोरदार धडक दिल्याने होमगार्ड गंभीर जखमी झाला आहे. सदरील घटना सोमवारी सकाळी माहूर-किनवट रोडवर साईनगर जवळ घडली आहे.
सिंदखेड पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले शिवाजी ज्ञानदेव मिरासे हे किनवट पथकातील कर्मचारी १० वीच्या आष्टा येथील परीक्षा केंद्र कडे आपल्या दुचाकीने जात होते,या वेळी साईनगर समोर राष्ट्रीय राज्यमार्गवर अचानक त्यांच्या दुचाकीला रानडुक्कराने जोराची धडक दिली.यात त्यांचा अपघात झाला.त्यांना हातापायाला गंभीर दुखापत झाली.मागून येत असलेले सिंदखेड पोलीस ठाण्यातील हवालदार संजीवन सानप, होमगार्ड निखिल हराळ,राहुल राठोड,सलमान खान यांनी मिरासे यांना माहूर च्या ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले.त्यांच्यावर डॉ.किरण कुमार वाघमारे यांनी प्राथमिक उपचार करून यवतमाळ कडे अधिक उपचारासाठी रवाना केले.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार,गोपनीय शाखेचे शारदासुत खामणकर,परमेश्वर कनकावार यांनी रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली.