ज्याला पैसा आणि अहंकाराची ‘खाज’ आहे,आशा व्यक्तीला मी कशाला मस्का लावू राम शिंदे साहेब पुड्या सोडू नका, ‘खेकड्या’ची चाल लोकं स्वीकारत नाहीत, हिम्मत असेल तर याचा पुरावा द्या आणि यापुढं तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा…. आमदार रोहित पवार यांची आ. राम शिंदे आणि मंत्री तानाजी सावंत यांच्यावर बोचरी टीका
जामखेड तालुका प्रतिनिधी
जामखेड कर्जत मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि नुकतेच विधान परिषदेवर निवडून गेलेले भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी सुरू असून दिवाळी निमित्ताने आमदार राम शिंदे यांनी चौंडी येथे दिवाळी फराळाचा कार्यक्रम ठेवला होता. या ठिकाणी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर चांगलीच जहरी टीका केली होती.तानाजी सावंत यांनी जामखेड कर्जत मतदारसंघात येऊ नये यासाठी आमदार रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांना दहा फोन करून जाऊ नका असे सांगितले होते असा आरोप आमदार राम शिंदे यांनी केला होता. तर सातत्याने मागच्या दाराने आमदारकी मिळवली म्हणून आमदार रोहित पवार हे टीका करत असतात त्याला प्रत्युत्तर म्हणून आमदार राम शिंदे यांनी शरद पवार हे राज्यसभेवर मागच्या दाराने जातात मग आता तुम्ही त्यांनाही लक्ष करणार का अशी टीका केली होती. यावर आता रोहित पवार यांनी ट्विट करून उत्तर दिले असून या ट्विटद्वारे आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि आमदार राम शिंदे यांच्यावर चांगलीच बोचरी टीका केली आहे.
माझ्या मतदारसंघात येऊ नका म्हणून आमदार रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांना दहा फोन केले. : राम शिंदे
ज्याला पैसा आणि अहंकाराची ‘खाज’ आहे, ज्याला हाफकीन संस्था आहे की व्यक्ती हेही माहीत नाही, जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू?राम शिंदे साहेब पुड्या सोडू नका, ‘खेकड्या’ची चाल लोकं स्वीकारत नाहीत, हिम्मत असेल तर याचा पुरावा द्या आणि यापुढं तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा….
मग मैदानात बघू!
आमदार रोहित पवार