राशिभविष्य/दिनविशेष/पंचांग

0

आजचा दिवस 

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, फाल्गुन पौर्णिमा दु. १२ वा २५ मि. पर्यंत नंतर फाल्गुन कृष्ण प्रतिपदा, धुलिवंदन, करिदिन, शुक्रवार, दि. १४ मार्च २०२५, चंद्र – सिंह राशीत दु. १२ वा.५६ मि. पर्यंत नंतर कन्या राशीत, नक्षत्र – उत्तरा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ४९ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ४७ मि.                                                                       

नमस्कार आज चंद्र सिंह राशीत दु. १२ वा. ५६ मि. पर्यंत रहात असून नंतर तो कन्या राशीत रहाणार आहे. आजचा दिवस करिदिन वर्ज्य दिवस आहे. आज रवि – चंद्र प्रतियोग, चंद्र -शनि प्रतियोग होत आहे. आजचा दिवस सर्व राशींना संमिश्र स्वरुपाचा जाईल.  

                                         दैनंदिन राशिभविष्य

This image has an empty alt attribute; its file name is IMG-20250222-WA0003-1-1.jpg

मेष : दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्य जपावे. वाहने सावकाश व लक्षपूर्वक चालवावित. मनोबल कमी राहील.

वृषभ : उत्साह व उमेद वाढेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे व गुंतवणूकीची कामे दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर प्रियजनांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल. 

मिथुन : दुपारपूर्वी प्रवासाचे योग येतील. कामाचा ताण कमी राहील. दुपारनंतर मानसिक सौख्य लाभेल. आनंदी व आशावादी रहाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील.

कर्क : आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल आहे, महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना प्रवास संभवतो. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. 

सिंह : महत्वाची कामे होतील. आर्थिक व्यवहार दुपारनंतर करावेत. आनंदी वार्ता मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. आनंदी रहाणार आहात.

कन्या : कामाचा ताण असणार आहे. दिवसाची सुरुवात निरुत्साही असली तरी दुपारनंतर उत्साह वाढेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. उत्साह व उमेद वाढेल. 

तुला : दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना निरुत्साह जाणवणार आहे. प्रवास आज नकोत. दुपारनंतर काहींना एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक : मानसिक ताकद उत्तम राहील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल. आनंदी व आशावादी रहाल. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. 

धनु : नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. दुपारनंतर विशेष उत्साही रहाल. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. 

मकर : दुपारनंतर तुमची मानसिकता सुधारेल. दुपारनंतर काहींना उत्साही वाटेल. कामाचा ताण मात्र असणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. 

कुंभ : हितशत्रूवर मात करणार आहात. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. दुपारनंतर काहींना मनस्ताप संभवतो. प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे.

मीन : दुपारनंतर तुमची दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. वाहने सावकाश चालवावीत. मनोधैर्य कमी राहील. खर्च वाढतील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी.

आज शुक्रवार, आज सकाळी १०.३० ते १२ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here