राशिभविष्य /दिनविशेष /पंचांग

0

आजचा दिवस

शके १९४५, शोभननाम संवत्सर, कार्तिक शुक्ल नवमी, मंगळवार , दि. २१ नोव्हेंबर २०२३, कूष्मांड नवमी, चंद्र – कुंभ राशीत, नक्षत्र – शततारका, सुर्योदय- सकाळी ६ वा. ५० मि. , सुर्यास्त-   सायं. १७ वा. ५८ मि. 

नमस्कार आज चंद्र कुंभ राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज बुध – चन्द्र केंद्रयोग, गुरु – चंद्र लाभयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथून, सिंह, तुला, वृश्चिक, धनु, मकर व कुंभ या राशींना अनुकूल तर कर्क, कन्या व मीन या राशींना प्रतिकूल जाईल.

               दैनंदिन राशिभविष्य Today’s horoscope

मेष : काहींना आर्थिक लाभ होणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. कामाचा ताण कमी राहील. आनंदी रहाणार आहात.

वृषभ : तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. आपला दबदबा राहील. कामाचा उरक राहील. अनेक कामात सुयश लाभेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

मिथुन : मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील. जिद्द वाढणार आहे. तुमचे कार्यक्षेत्र व्यापक होणार आहे.

कर्क : एखादी मनस्तापदायक घटना संभवते. शांत व संयमी रहावे. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणे टाळावे. मनोबल कमी असणार आहे.

सिंह : उत्साही रहाल. अनेक कामात सुयश लाभणार आहे. दैनंदिन कामे उत्तम रीतीने पार पडतील. आत्मविश्वासपूर्वक रहाल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : मनोबल कमी राहील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. स्वास्थ्य कमी राहील. दैनंदिन कामास विनाकारण विलंब लागणार आहे.

तुला : प्रियजन भेटणार आहेत. आनंदी दिवस असणार आहे. काहींना विविध लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.

वृश्चिक : आनंदी व आशावादी रहाणार आहात. मनोबल उत्तम असणार आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होतील.

धनु : कामाचा ताण असला तरी चिकाटीने ती पूर्ण करणार आहात. मनोबल उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात. आरोग्य उत्तम राहील. काहींना गुरुजन भेटतील.

मकर : आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. आनंदी रहाणार आहात.

कुंभ : अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. आता हळूहळू आपले प्रश्न मार्गी लागणार आहेत. प्रवासाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे.

मीन : वैचारिक मतभेद राहतील. कौटुंबिक वादविवाद संभवतात. आपले बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. मनोबल कमी असणार आहे. शांत व संयमी रहावे.

आज मंगळवार, आज दुपारी ३ ते ४.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here