आजचा दिवस
शके १९४५, शोभननाम संवत्सर, कार्तिक कृष्ण पंचमी सायं. ५ वा. १५ मि. पर्यंत नंतर षष्ठी, शनिवार , दि. २ डिसेंबर २०२३, चंद्र – कर्क राशीत, नक्षत्र – पुष्य, सुर्योदय- सकाळी ६ वा. ५७ मि. , सुर्यास्त- सायं. १७ वा. ५९ मि.
नमस्कार आज चंद्र कर्क राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज रवि – चंद्र त्रिकोणयोग, चंद्र – मंगळ त्रिकोणयोग, चंद्र – गुरु केन्द्रयोग व बुध – शनि लाभयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तुला, वृश्चिक, मकर व मीन या सर्व राशींना अनुकूल तर सिंह, धनु व कुंभ या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य Todays horoscope
मेष : आरोग्य उत्तम राहणार आहे. आज तुम्ही नवीन काहीतरी करण्यास उत्सुक असणार आहात. मनोबल उत्तम राहील. आनंदी व आशावादी रहाणार आहात.
वृषभ : तुमच्यामध्ये नवीन जिद्द निर्माण होईल. तुमच्या कामाच्या कक्षा रुंदावणार आहेत. आनंदी रहाल. अपेक्षित फोनकॉल होतील.
मिथुन : आर्थिक कामास अनुकूलता असेल. काहींना अचानक धनलाभ होतील. काहींना नवीन एखादी बातमी समजेल. गुप्तवार्ता समजतील.
कर्क : आनंद व उत्साह ओसंडून वाहणार आहे. आरोग्य उत्तम राहील. कामे मार्गी लावणार आहात. प्रवास सुखकर होतील.
सिंह : निरुत्साह जाणवणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. मनोबल कमी असणार आहे. वाहने सावकाश चालवावीत. एखादा मनस्ताप संभवतो.
कन्या : काहींना आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल वाढणार आहे. परिजनांनासमवेत आनंदी रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तुला : तुमचा उत्साह विशेष राहील. नोकरीत आनंद लाभेल. व्यवसायतील प्रश्न मार्गी लागणार आहेत. मनोबल उत्तम राहील. तुमचा प्रभाव वाढेल.
वृश्चिक : कामे मार्गी लावू शकणार आहात. कामाचा ताण कमी होईल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. उत्साह वाढेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील.
धनु : मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात एखादी चूक होईल. मनोबल कमी असल्याने नैराश्य जाणवेल. काहींना अनावश्यक ताण वाटेल.
मकर : उत्साही रहाल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. तुम्ही आपली मते पटवून देऊ शकणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत.
कुंभ : मनोबल कमी राहील. कामाचा ताण जाणवेल. दैनंदिन कामे रखडणार आहेत. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी.
मीन : मनोबल वाढणार आहे. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. काहींना विविध लाभ होणार आहेत. कामाचा व्याप वाढणार आहे.
आज शनिवार, आज सकाळी ९ ते १०.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४