राशिभविष्य/पंचांग/दिनविशेष

0

आजचा दिवस Today’s Horoscope

शके १९४५, शोभननाम संवत्सर, भाद्रपद अमावस्या,  शनिवार, दि. १४ ऑक्टोबर २०२३, सर्वपित्री दर्श अमावस्या, अमावस्या श्राद्ध, चंद्र – कन्या राशीत, नक्षत्र – हस्त दुपारी ४ वा. २४ मि. पर्यंत नंतर चित्रा, सुर्योदय- सकाळी ६ वा. ३३ मि. , सुर्यास्त-   सायं. १८ वा. १६ मि. 

नमस्कार आज चंद्र कन्या राशीत रहाणार आहे. आजचा दिवस वर्ज्य दिवस आहे. आज रवि –  चन्द्र व बुध – चंद्र युतीयोग होत आहे. आजचा दिवस वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु, मकर व मीन या राशींना अनुकूल तर मेष, तुला व कुंभ या राशींना प्रतिकूल जाईल.

दैनंदिन राशिभविष्य Astrology

मेष : शांत व संयमी रहावे. मनोबल कमी असणार आहे. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवासात व वाहने चालविताना दक्षता घ्यावी. खर्च वाढणार आहेत.

वृषभ : मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काहींना अचानक धनलाभ होणार आहे. प्रवास सुखकर होतील. विविध लाभ होणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. विशेष प्रसन्नपणे कार्यरत राहणार आहात. प्रवास सुखकर होतील. नोकरी, व्यवसायात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील रहाल.

कर्क : नातेवाईक भेटणार आहेत. उचित मार्गदर्शन लाभेल. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. जिद्दीने काम करणार आहात. आनंदी राहणार आहात.

सिंह : कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद साधणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. आर्थिक कामा संदर्भातील चर्चा सफल होईल.

कन्या : विशेष उत्साही रहाल. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहाल. प्रवास सुखकर होणार आहेत.

तुला : मनोबल कमी राहील. आज आपणाला कसली न कसली चिंता लागून राहणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने सावकाश चालवावीत. हितशत्रूवर मात करू शकणार आहात.

वृश्चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. सन्तातिसौख्य लाभेल. काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सल्ला मसलत कराल.

धनु : तुम्ही तुमचे वर्चस्व सिद्ध कराल. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. प्रवास सुखकर होतील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आर्थिक कामे होतील.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित असणारी सुसंधी तुम्हाला लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. काहींना अनपेक्षितपणे नातेवाईक भेटतील. आरोग्य सुधारेल.

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. सध्या आपण ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करत रहावे. संयमी रहावे. कामामध्ये चूक होण्याची शक्यता आहे.

मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत . प्रवास सुखकर होतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे.

आज शनिवार, आज सकाळी ९ ते १०.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here