राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष काटे यांचे आमरण अन्नत्याग उपोषण.

0

उलवे मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात. कचरा, घाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची संतोष काटे यांची मागणी.

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे )उलवे मधील विविध रस्त्यावर जे कोंबडे – बोकडे कापले जात आहेत. मांस विक्री केली जात आहे. ही दुकाने अनधिकृत आहेत अशी अनधिकृत चिकन मटणची दुकाने उलवे मध्ये सर्वत्र थाटलीं आहेत.त्यामुळे मोठया प्रमाणात शाळे लागत रोगराई पसरत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तरी देखील सिडको प्रशासन किंवा पोलीस प्रशासन तर्फे जाणीव पूर्वक कारवाई केली जात नाही. हिंदू धर्माचा नवरात्र उत्सव चालू झाला आहे, डेंग्यूने, मलेरियाने उलवे शहर मधील लोक मृत्युमुखी पडत आहेत परंतु  तक्रार करून,पाठपुरवठा करून  सुद्धा कोणतीही अद्याप कारवाई पोलीस प्रशासन कडून केलेली नाही.त्याकारणाने उलवे शहर स्वच्छ व सूंदर राहावे, नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे, कचरा- घाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी या प्रमुख मागणीसाठी उलवे शहराला  न्याय मिळवून देण्यासाठी  दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे उलवे नोड शहराध्यक्ष संतोष काटे हे आमरण अन्नत्याग उपोषणास बसले आहेत.

उलवे शहरात प्रत्येक रोडवर फुटपाथला चिकन, मटण दुकानांदारांनी व्यवसाय थाटले आहेत. सदर व्यवसाय धारक चिकण, मटणचा निघालेला कचरा रस्त्यावरच टाकतात, तसेच व्यवसाय करत असतांना योग्य तो प्रोटोकॉल पाळत नाही व उलवे शहरातील प्रत्येक रस्त्यावर असणारे चिकन व मटण दुकानदार हे घाणीचे साम्राज्य पसरवत आहेत. त्यामुळे नागरिकाचे आरोग्यास व परिणामी जिवितास धोका निर्माण झालेला आहे. सध्या नवरात्रौत्सव चालू असल्याने अनेक नागरिक सदर चिकन, मटण दुकानांबाबत तक्रार करत आहेत. तरी सदर बाबत तातडीने कारवाई व्हावी अशी विनंती पत्रव्यवहाराच्या माध्यमातून उलवे नोड शहर अध्यक्ष संतोष काटे यांनी सिडको प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे केली आहे.जर सदर मागणीची योग्य दखल घेतली नाही तर पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संतोष काटे यांनी प्रशासनाला दिला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी पूर्णपणे प्रशासनच जबाबदार असेल असे संतोष काटे यांनी यावेळी सांगितले.यावेळी उपाध्यक्ष भारत निकाळजे, उपाध्यक्ष राहुल पाटेकर, सरचिटणीस उदयभन मिश्रा,पृथ्वी नाईक, संतोष डोंगरे, कुलदीप तिवारी, प्रेसिला ब्रिटो, सुनीता चव्हाण आदी मान्यवर यांनी उपोषण स्थळी जाऊन संतोष काटे यांची भेट घेउन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here