राहुरीच्या पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा वर बलात्काराचा गुन्हा दाखल 

0

रक्षणकर्ता करता झाला भक्षणकर्ता.

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

              राहुरी तालुक्यात रक्षणकर्ताच महिलेचा भक्षणकर्ता झाला आहे. दवणगाव परीसरातील एक महिला फसवणूकीची तक्रार करण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात आली असताना तक्रारी तुमचे काम मी करून दिल्यास यामध्ये माझा काय फायदा होईल असे पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा याने विचारुन शरीरसुखाची मागणी केली असता त्या महिलेने 8 जुलै रोजी पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रार दाखल केली असता ती महिला दिलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात आली असता पोलीस उपनिरीक्षक नाऱ्हेडा याने तु माझ्या विरोधात तक्रार केली आहे. तु माझ्या घरी ये असे सांगितले नाऱ्हेडा यांनी ती महिला घरी आल्यावर बळजबरीने जबरदस्तीने शारिरीक संबंध केल्याची फिर्याद सोमवारी मध्यराञी नंतर दाखल करण्यात आली. राहुरी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर हा गुन्हा दाबुन ठेवला. प्रसार माध्यमांना याबाबतची भनकही लागू दिली नाही. अखेर सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलीस खात्याच्या ब्रीदवाक्यास राहुरी पोलीस ठाण्यातून कलंक लागला आहे.

             याबाबत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरुन मिळालेली माहिती अशी की,पिडीत महिलेची फिर्याद दाखल करण्यास सुरवातीला टाळाटाळ करण्यात आली होती.परंतू तालुक्यातील एका संघटनेच्या महिला पदाधिकारी या महिलेच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्याने राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी राञी उशिरा गुन्हा दाखल केला.सदरचा गुन्हा दाखल होवूनही प्रसार माध्यमा पासुन लपवून ठेवला होता.

             राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सजन्नकुमार नाऱ्हेडा यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलीस खात्याच्या ब्रीदवाक्यास राहुरी पोलीस ठाण्यातून कलंक लागला आहे. राहुरी तालुक्यातील  दवणगाव परिसरातील पिडीत महिलेनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सदर पीडित महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हंटले की,देवळाली प्रवरा येथील प्रशांत बापूसाहेब चव्हाण याने जमीन खरेदीत माझी फसवणूक केली असल्याची तक्रार अर्ज देण्यासाठी देवळाली प्रवरा पोलीस दूरक्षेत्र येथे गेले होते. तेथे एक अनोळखी इसमाने तक्रारी अर्जाबाबत विचारुन पोलीस उपनिरीक्षक सजन्नकुमार नाऱ्हेडा यांचा मोबाईल नंबर दिला व म्हणाला की, हा नंबर राहूरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याचा आहे. त्यांना तुम्ही फोन करा ते तुमची तक्रार घेतील असे सांगितल्याने मी माझ्या मोबाईल वरून फोन लावुन राहुरी पोलीस स्टेशनला फोन लागला आहे. का असे विचारले तेव्हा त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनला फोन लागलेला आहे. असे सांगितले. त्यानंतर मी त्यांना माझ्या तक्रार अर्जाबाबत त्यांना सांगितले असता त्यांनी मला दोन दिवसानंतर माझ्या ऑफिस मध्ये या मी दोन दिवसानंतर पोलीस स्टेशनला येणार आहे असे सांगितले. त्यानंतर पिडीत महिला दि. 7 जुलै रोजी नाऱ्हेडा  यांच्या विरुध्द पोलीस पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. तक्रारी नंतर व्हाईस कॉल करून तु माझ्या विरुध्द तक्रारी अर्ज का केला आहे  तुझ्या विरुध्द  गुन्हा दाखल करील अशी धमकी दिली. व्हाइस कॉल करुन तु जर माझ्याकडे आली नाही. तर  मी तुझ्या घरी येवुन तुझ्या मुलासमोर मी बलत्कार करील अशी धमकी दिली. दि.17 जुलै रोजी दुपारी 3:30 वा. सुमारास राहुरी तहसिल कार्यालयात कामानिमीत्त आले असताना तहसिल कार्यालयात कागदपञे देण्यासाठी  झेरॉक्स काढीत असताना नाऱ्हेडा माझ्याकडे आले तुला आता माझ्या सोबत रुमवर यावे लागेल. मी त्यांना नकार दिल्यावर ते मला म्हणाले की, रात्री मी तुझ्या घरी येवुन तुझ्या मुलासमोर बलात्कार करण्याची धमकी दिली. दुपारी 4 वा. मला माझ्या स्कुटी गाडीवरुन त्यांचे राहुरी स्टेशन रोडला असलेल्या रूमवर नेले तेथे त्यांनी माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. सायंकाळी 6 वाजल्या पासून फिर्याद दाखल करण्याची विनंती पोलीस निरीक्षक जाधव यांना केली.परंतू पोलीसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली.एका संघटनेच्या महिला पदाधिकारी यांनी फिर्याद दाखल करण्याचा आग्रह धरल्या नंतर  मध्यराञी नंतर पिडीत महिलेची फीर्याद दाखल करण्यात आली.

            गेल्या महिन्यात राहुरी येथे एका वृत्तपत्रात हॅनी ट्रॅपची बातमी प्रसारीत झाली होती. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यालयात जाऊन धिंगाना घातला होता. त्या प्रकरणात आरोपी पोलिस उप निरिक्षक सज्जन नाऱ्हेडा याचे नाव चर्चेत आले होते. त्यानंतर आता सज्जन नाऱ्हेडा याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने तालूक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली.

                पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा  याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा आधीक तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

रक्षणकर्ता करता झाला भक्षणकर्ता.

        सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलीस खात्याचे ब्रीदवाक्य आहे आणि ते प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये ठळक अक्षरात लिहिलेले असते याचा अर्थ असा होतो की पोलीस सर्व सामान्य जनतेच्या रक्षणासाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच खलप्रवृतीच्या म्हणजेच दुष्टांचा नि:पात करण्यासाठी त्यांना ठेचण्यासाठी चागल्या लोकांचे वाईट लोकांपासून संरक्षण व खल पुरुषाचा नायनाट ह्या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत. परंतू राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सजन्नकुमार नाऱ्हेडा याने दुर्जणांचा नायनाट करण्या ऐवजी रक्षणकर्ता करता झाला भक्षणकर्ता.

.त्या पिडीत महिले पैशाचे आमिष दाखविले

             पिडीत महिला राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी आली असता तीची फिर्याद घेण्यास टाळाटाळ करण्यात आली.परंतू एका संघटनेच्या महिला पदाधिकारी या पिडीत महिलेच्या मदतीसाठी धावून आल्याने फिर्याद दाखल करण्यापुर्वी तालुक्यातील व तालुक्या बाहेरील लोकप्रतिनिधी व पोलीस ठाण्यात पडून असलेले स्वयंघोषीत पुढारी यांनी महिलेची समजुत काढुन 50 लाख रुपयाचे आमिष दाखविले.परंतू पिडीत महिलेने त्या सर्वांच्या विनंत्या फेटाळून लावल्या.अखेर फिर्याद दाखल करण्यात आली.

चौकट 

         देवळाली प्रवरा शहरात एका राजकीय नेत्या  जवळे काही कार्यकर्ते व पोलीस उपनिरीक्षक नाऱ्हेडा यांचे जवळे संबध होते.हे कार्यकर्ते नाऱ्हेडा यांच्या रंगित संगित पाटर्या करतात.त्याला शरीर सुखासाठी सावज शोधण्याचे काम त्यांच्याकडे होते.देवळाली प्रवरा पोलीस चौकीत पिडीत महिलेस पोलीस उपनिरीक्षक सजन्नकुमार नाऱ्हेडा यांचा मोबाईल नंबर देणारा त्या चौकडीतीलच व्यक्ती असावी अशी चर्चा देवळालीत सुरु आहे.

आ.प्राजक्त तनपुरेंची लक्षवेधी,बडतर्फ करणार गृहमंञी फडवणीसांचे उत्तर

        राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नाऱ्हेडा याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर  या बाबत आमदार प्राजक्त तनपूरे यांनी आज विधान सभेत लक्षवेधी प्रश्न मांडून राहुरी येथील पोलिस निरीक्षक व संबंधित आरोपी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.गृहमंञी फडणवीस यांनी माहिती घेवून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्यांस बडतर्फ केले जाईल असे उत्तर लक्षवेधीला देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here