सातारा/अनिल वीर: रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार नीलम रणदिवे-बल्लाळ यांची महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सहविचार सभा घेऊन नीलम रणदिवे यांची निवड झाल्याने प.जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्ह्यातील तालुका कार्यकारणी पूर्ण करणे, गाव तिथे शाखेचे नियोजन करणे, लवकरच जिल्हा मेळावा घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.सदरच्या सभेस जिल्हा संघटक किरण अडसूळ, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सकपाळ, तालुकाध्यक्ष सचिन कांबळे (पाटण),रमेश गायकवाड (सातारा), शहराध्यक्ष मनोज कांबळे(सातारा) व तालुकाध्यक्ष हैजीफा मुल्ला(कराड) यांच्यासह अक्षय गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : नीलम रणदिवे यांचा सत्कार करताना विशाल भोसले शेजारी पदाधिकारी व कार्यकर्ते.(छाया-अनिल वीर)