देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील सर्वच शासकीय ठेकेदारांनी एकत्र येत तहसीलदार कार्यालयामध्ये गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबाबत शासकीय कामकाजाबाबत असलेले निर्बंध हटविण्याची मागणी केली. तशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार संध्या दळवी यांना देण्यात आले. राहुरी महसूल कार्यालयामसमोर आलेल्या ठेकेदारांनी आपल्याभावना व्यक्त केल्या आहेत.
शासनाकडून कोणत्याही कामाच्या निविदा प्रसिद्ध करताना त्यामध्ये शासकीय गौण खनिजाची रॉयल्टी अदा घेऊनच ठेकेदारांना काम सोपविले जाते. शासकीय निधीतूनच रॉयल्टी अदा होत असतानाही महसूल प्रशासनाकडून शासकीय कामकाजासाठी लागणाऱ्या वाळू, मुरुम, माती किंवा खडी बाबत दंडात्मक कारवाई होती. त्यामुळे शासकीय कामकाज पूर्ण करताना ठेकेदारांची दमछाक होत
शासकीय निधीतून विकासकामे करताना होणारी व अडचण लक्षात घेता महसूल प्रशासनाने वाळू, खडी व मुरूम वाहतुकीवरील निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात आली. याबाबत राहुरी महसूल प्रशासला निवेदन देण्यात आले.
निवेदनावर ठेकेदार अजित डावखर, मोईन देशमुख, किरण गव्हाणे, योगेश शिंदे, जीशान शेख, प्रतिक देशमुख, अक्षय भुजाडी, अजिंक्य निमसे, भाऊसाहेब शिंदे, विलास लाटे, विटनोर सौरभ, प्रविण बिडगर, हर्षल बिराडे, जयेश गडगुळे, विवेक लांबे, निखील जवरे, शुभम कल्हापूरे, विनीत शिरसाठ, सचिन धुमाळ, राजेश धागे, प्रफुल्ल उंडे, ओंकार ढोकणे, गोरक्षनाथ ढोकणे, सीताराम शिंदे, बाबासाहेब वाघमोडे, किशोर चौधरी, कलिम सय्यद आदींच्या सह्या आहेत.