विरंगुळा केंद्र व अंगणवाडीचे उदघाटन.

0

उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )

मंगळवार दि 11/10/2022 रोजी  सकाळी 11 वा. जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, आणि पंचायत समिती उरण च्या माध्यमातून अंगणवाडीचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. उरण तालुक्यातील मुळेखंड फाटा करंजा रोड येथे चाणजे विभाग , शेतकरी कामगार पक्ष  उरण पंचायत समिती माजी सभापती ॲड सागर कडू यांच्या स्वखर्चाने  मुळेखंडच्या जेष्ठ नागरीक संघटनेचे विरंगुळा केंद्र हाॅलचे काम करण्यात आले आहे . अंगणवाडीचे उदघाटन शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी अध्यक्षा सीमा अनंत घरत यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विरंगुळा केंद्र हाॅलचे उदघाटन तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांच्या हस्ते करण्यात आले.उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद घरत‌,जेष्ठ नागरिक अध्यक्ष व पदाधिकारी ,मुळेखंड गावचे आजी माजी अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र म्हात्रे,कामगारनेते अनंत घरत, पंचायत समिती अधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here