संगमनेर : काल सोमवारी संगमनेर तालुक्याला विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने झोडपून काढले. यावेळी रानात मेंढ्या व शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेलेल्या एका मेंढपाळाच्या कळपावर वीज पडल्याने या मेंढपाळाच्या सात मेंढ्या व एक शेळी जागीच ठार झाल्याची घटना लोहारे शिवारात घडली.
तालुक्यातील लोहारे शिवारात काल सोमवारी कासारे येथील मेंढपाळ रमेश नारायण कानकाटे हे आपल्या शेळ्या मेंढ्यांचा कळप घेऊन लोहारे शिवारात मेंढ्या शेळ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुपारच्या दोन वाजेच्या सुमारास मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. विजाच्या कडकडाटात सुरू झालेल्या या पावसासोबत एक विज कडाडत कानकाटे यांच्या शेतात चरत असणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर पडली.त्यात मेंढपाळ कानकाटे यांच्या सात मेंढ्या व एक शेळी जागीच ठार झाली. घटनेची माहिती समजताच स्थानिक नागरीक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वीज पडुन सात मेंढ्या व एक शेळी ठार झाल्याने मेंढपाळ रमेश कानकाटे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सदर घटनेचा पंचनामा करून मेंढपाळ कानकाटे यांना प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.