शहर उपजीविका केंद्र सुरू करण्यात येणार : अजित निकत 

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

          “महिलांनी आपल्या शहरातील उपलब्ध साधन संपत्तीचा उपयोग करून छोटे-मोठे उद्योग व्यवसाय उभे केले पाहिजेत,त्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने सहकार्य करण्यात येत असून शहरस्तरावर बचत गटातील महिलांचा संघ स्थापन करण्यात आला आहे,या संघाच्या माध्यमातून शहरस्तरावर लवकरच शहर उपजीविका केंद्र सुरू करण्यात येणार आहे” असे प्रतिपादन देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले.

     देवळालीप्रवरा नगरपरिषदेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महिला बचत गटाच्या विकासवर्धिनी शहरस्तरीय संघ व वस्तीस्तर संघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.पुढे बोलताना श्री.अजित निकत म्हणाले की, ‘महिलांनी आपले प्रश्न व अडीअडचणी सोडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवांनी सोबतच इतरही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे,शहरांमध्ये स्वच्छ भारत अभियान व इतर अनेक उपक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहेत,त्यामध्येही महिलांचा सहभाग  स्वयंस्पुर्तीने असला पाहिजे.’

  यावेळी सहा.प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी, प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक, विकासवर्धिनी शहरस्तर संघाच्या अध्यक्षा श्रीमती कमल मुसमाडे,जयश्री येवले, सुजाता मुसमाडे,जयश्री बारवकर,अनिता म्हस्के,शर्मिला रूपटक्के,रेखा हारदे,रुपाली कुमावत,सोनिया विजन,अश्विनी मुसमाडे उपस्थित होत्या.      

   यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी उभारण्यात येणाऱ्या शहर उपजीविका केंद्रा बद्दल व समूह संसाधन व्यक्ती (सीआरपी) बाबतची माहिती दिली.समुदाय संघटक सविता हारदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व माविम च्या क्षेत्रीय समन्वयक वंदना आल्हाट यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here