दिल्ली : गेल्या तीन महिन्यापूर्वी स्थापन झालेले राज्य सरकार राहणार की जाणार याचा फैसला ०१नोव्हेंबरला होणार आहे. सुप्रीम कोर्टाने (Court) राज्यातील सत्तासंघर्षाबाबत ०१ नोव्हेंबर पाच खंडपीठासमोर सुनावणी (Hearing) होणार असल्याचे निश्चित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड, एम आर शाह, कृष्ण मुरारी, हिमा कोहली, पी नरसिंमा यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सरकार राहणार की टिकणार, सुप्रीम कोर्टात सुनावणी कधी होणार ? अशी चर्चा सुरू होती. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर सरकार बेकायदेशीर असल्याचाही आरोप केला जात होता. त्यामुळे सरकारचं नेमकं काय होणार हे आता ०१ नोव्हेंबरला याबाबत स्पष्टता होण्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये शिवसेनेचा शिंदे गट म्हणजेच बाळसाहेबांची शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आहे, याच सत्तेचे भविष्य काय ? याची स्पष्टता सुप्रीम कोर्टात ०१ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आणि ठाकरे गटाचे सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
उद्धव ठाकरे गटाने १६ आमदारांचे निलंबन, विधानसभा अध्यक्ष पदावरून घेतलेले निर्णय याच्या विरोधात धाव घेण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविरोधात याचिका दाखल करत ठाकरेंना आव्हान देत आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा केला आहे. त्यामुळे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर याचा पेच सुप्रीम कोर्टात सुटणार आहे. याशिवाय शिवसेना कुणाची याचा देखील फैसला सुप्रीम कोर्टातच होणार आहे.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड, एम आर शाह, कृष्ण मुरारी, हिमा कोहली, पी नरसिंमा यांच्यासमोर ही सुनावणी होणार असुन या सुनावणीकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.