मुंबई /नाशिक :शिक्षकांची वैद्यकीय व पुरवणी बिले दिवाळीपुर्वी अदा करण्याची मागणी मुख्याध्यापक संघाने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. मुख्यध्यापक संघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या रामटेक या निवासस्थानी पदवीधर आमदार सुधीरजी तांबे नाशिक विभाग नाशिक ,शिक्षकआमदार विक्रम काळे मराठवाडा विभाग, शिक्षक आमदार बाळाराम पाटील कोकण विभाग .प .महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे सचिव, एस बी देशमुख संस्थाचालक, महेंद्र जोंधळे यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली. यावेळी शिक्षकांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वैद्यकीय आणि पुरवणी बिले शासनाने लवकरात लवकर अदा करण्याची मागणी करण्यात आली.
यात एकट्या नाशिकची पुरवणी बिले १३३ कोटी रुपये, सहा ते सात वर्षापासून प्रलंबीत आहे . मेडिकल व इतर बिले १६ ते १७ कोटी रुपये सहा ते सात वर्षापासून प्रलंबित आहे याबाबत मुख्याध्यापक संघाने सतत शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त यांच्याकडे प्रयत्न करूनही मार्ग निघालेला नाही . सध्या दिवाळी आहे शिक्षकांचे मुला /मुलींचे लग्न ,शिक्षण, आई वडीलांचे आजारपण यासारख्या महत्त्वपूर्ण बाबी प्रलंबित आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांची अशी स्थिती असताना शासन यावर कोणताही ठोस निर्णय घेत नाही त्यामुळे संपूर्ण राज्यातील शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. ही संपूर्ण बिले शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे पडून आहेत. शासन जोपर्यंत या बिलांना मान्यता देत नाही तोपर्यंत ही बिले मिळणे कठीण आहे. म्हणून शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे त्याचप्रमाणे शिक्षकांना BLO सारखी अशैक्षणिक कामे देऊ नये तसेच २०% व ४० % अनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमाप्रमाणे १०० टक्के अनुदान मंजूर करावे . जूनी पेंन्शन योजना लागू करावी , शिक्षकांचे पगार १ तारखेलाच व्हावे याबाबत सविस्तर चर्चा करून शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी शाळांचे सर्वच प्रश्न तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून तातडीने प्रश्न सोडवण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या बैठकीमध्ये दिले तसेच कोविड काळात विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन मागे पडले असून विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करू नये अशी विनंती शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली.