शिर्डी विमानतळ जप्तीची नोटीस

0

शिर्डी /कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायत हद्दीत असणारे शिर्डी विमानतळ जप्त करण्याची नोटीस बजावल्याने एकाच खळबळ उडाली आहे. शिर्डी विमानतळ विकास प्राधिकरणाने काकडी ग्रामपंचायतीचा कर थकवल्यामुळे वसुलीची नोटीस बजावली आहे. थकबाकी न भरल्यास विमानतळ जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा या नोटीस द्वारे देण्यात आला आहे . श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी शिर्डीपासून १५ किमी अंतरावर असलेल्या कोपरगाव तालुक्यातील काकडी गावात विमानतळ उभारण्यात आलं. मात्र हे विमानतळ उभारनिपासुनच या न त्या कारणाने वादात राहिले आहे.

शिर्डी विमानतळासाठी काकडी गावातील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमिनीचं भूसंपादन राज्य सरकारने केले . त्यावेळी काकडी गावात पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासाठी निधी देण्याचं आश्वासन महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरणानं दिलं होतं. काकडी गावच्या ग्रामस्थांनी गावचा विकास होईल, तरुणांना रोजगार मिळेल या आशेने आपली शेतजमीन कवडीमोल दराने विमानतळासाठी दिली . परंतु विकास तर दूरच राहिला उलटपक्षी त्याच काकडी गावचा कर थकवल्यामुळे हेच विमानतळ जप्त होण्याची वेळ आली आहे. विमानतळ प्राधिकरणाने ८ कोटी ३० लाख रुपयांचा कर थकवला आहे. कर थकल्याने गावातील विकासाला अडथळे निर्माण होतात. अनेकदा निवेदनं दिली गेली, नोटीस पाठवली गेली. मात्र अजूनही थकबाकी दिली नाही. विमानतळ प्राधिकरण, मुख्यमंत्री , पालकमंत्री तसंच शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही कराची रक्कम जमा होत नसल्याने अखेर ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस धाडली आहे, अशी माहिती काकडी गावच्या सरपंच पूर्वा गुंजाळ यांनी दिली आहे.

ज्या ठिकाणी हे विमानतळ आहे त्या काकडी ग्रामपंचायतीनेच विमानतळ जप्त करण्याची नोटीस बजावली आहे. ग्रामपंचायतने कलम 129 नुसार विमानतळाच्या मालमत्ता जप्तीचे नोटीस काढली आहे. यामध्ये विमानतळाच्या मालकीची टर्मिनस इमारत , पेट्रोल पंप, एटीसी टॉवरसह इतर मालमत्ता जप्त करण्याचा इशारा या नोटीस द्वारे देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here