शिवभोजन थाळी बंद होण्याच्या चर्चेने चालकांना धास्ती

0

शिवभोजन थाळी योजना बंद होणार? शिवभोजन चालक अडचणीत

मारोती सवंडकर नांदेड ः  

शासनाच्या दृष्टीने भुकेलेल्यांच्या पोटासाठी २६७ कोटी हा खर्च तसा नगण्य आहे. त्यामुळे राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करून शिवभोजन थाळी ही योजना पूर्ववत सुरु ठेवावी, अशी मागणी शिवभोजन केंद्र चालकांनी केली आहे

गोरगरिबांच्या खिशाला परवडेल असं सकस अन्न मिळावं यासाठी महाविकास आघाडी सरकारनं राज्यभर शिवभोजन थाळी ही योजना २०२० साली सुरू केली होती पुढे ती एकनाथ शिंदे यांच्या काळातही सुरू होती परंतु अलिकडे पुन्हा एकदा महायुती मोठ्या बहुमताने सत्तेत आल्यानंतर शिवभोजन थाळी ही योजना बंद होणार या चर्चांनी शिवभोजन केंद्र चालकांसह अनेक गोर-गरीबांची झोप उडाली आहे  

शिवभोजन थाळी विषयी प्रतिक्रिया देतांना एका केंद्र चालकाने सांगितले की, अगदी १० रुपयात संपूर्ण आहार मिळाल्याने गोरगरीब कष्टकरी देखील खुश झाले. परंतु ही थाळी आता बंद पडण्याच्या चर्चा आहे. ईतक्या वाढत्या महागाईमुळे केंद्र चालकांना अवघ्या दहा रुपयात ही थाळी देणं परवडत नाही तरी सुद्धा आम्ही मोठ्या काटकसरीने थाळीची पूर्तता करतोत पण अचानक शिवभोजन थाळी योजना बंद होणार या चर्चांनी आमच्या अडचणीत आणखी भर पडली आहे .राज्यातील गोर गरीब गरजू नागरिकांसाठी राज्यात सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना यापुढील काळातही पूर्ववत सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी शिवभोजन केंद्र चालकांनी केली आहे

शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा

छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन थाळी ही योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा आहे. गरीब आणि गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरु राहणे अत्यंत आवश्यक आहे.

शिवभोजन थाळी ही योजना पूर्ववत सुरु ठेवावी

शासनाच्या दृष्टीने भुकेलेल्यांच्या पोटासाठी २६७  कोटी हा खर्च तसा नगण्य आहे. त्यामुळे राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करून शिवभोजन थाळी ही योजना पूर्ववत सुरु ठेवावी, अशी मागणी शिवभोजन केंद्र चालकांनी केली आहे.

गोरगरीब व गरजूंसाठी शिवभोजन थाळीचा आधार ः दर वाढणारे पण अनुदान नाही :

दररोज शेकडो गोरगरीब कष्टकरी या केंद्रांवर आपली भूक भागवतात. त्यासोबतच ज्यांच्या घरी डबा करणारे कोणी नाहीत अशी मंडळी देखील या योजनेचा लाभ घेतात. परंतु वाढलेल्या महागाईने आता ही थाळी या दरात देणे परवडत नसल्याचं, केंद्र चालकांनी सांगितलं. सध्या जेवण बनविण्यास अत्यावश्यक असणारे . गॅसच्या किंमती, विजेचे दर, कांदा, लसूण, टोमॅटो, डाळी तसंच इतर भाज्यांचे भाव कडाडले आहेत. ही केंद्रे देखील झुणका भाकर केंद्रांप्रमाणे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ही केंद्रे जर बंद पडली तर येथे दरदिवशी जेवणाऱ्या कष्टकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळं सबसिडी वाढवून द्यावी अशी मागणी केंद्रचालकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here