रानसई येथील संपूर्ण सागाचीवाडीचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश
उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )
गुरुवार दि.20/10/2022 रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कार्याप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील रानसई येथील संपूर्ण सागाची वाडीने शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला. माजी आमदार मनोहरशेठ भोईर व तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांच्या हस्ते सर्व ग्रामस्थांनी शिवबंधन बांधून व भगवी शाल अर्पण करून सर्वांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले. यामध्ये भास्कर बंगरी,दिनेश बांगरी,धाऊ बंगारी,काळूराम पारधी,महादेव बांगारी, ग्रामपंचायत सदस्य शेवंता पारधी,नरेश भला,शनिवार वीर, प्रवीण पारधी,किसन भला
अंबाजी भाला,महादेव भगत, समाधान पारधी,गणेश बांगरि, विठ्ठल भाला,बुधाजी वीर,हिराजी पारधी,हिराजी भला,साईनाथ भला,गुरुनाथ पारधी,अविनाश भगत,नारायण वीर,धर्मा भला, महाधू भला,प्रमोद बंगारि, सूरज बांगारि,नरेंद्र पारधी,नरेश पारधी, जोमा पारधी,बबन ठोंबरे,धावू भला,पांडुरंग पारधी,नागेश बागारी,काळूराम बागारी, काळूराम भगत,कमलाकर भगत,हिराजी भगत,प्रकाश बागारी,राम बागारी,आल्या भगत,सुनील बागारी,धनाजी बागारी, रवी पारधी यांच्या नेतृत्वात संपूर्ण ग्रामस्थांनी व महिलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.या पक्ष प्रवेशाने माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून येते.
या वेळी विभागप्रमुख संदेश पाटील,उरण शहर संपर्कप्रमुख, गणेश म्हात्रे , कु कोमल भोईर, पी डी घरत, प्रकाश म्हात्रे,शिवसेना शाखा रानसई चे पदाधिकारी दीपक लेंडे, बाळाराम खंडवी, आयत्या दोरे, भास्कर बांगारी, पद्माकर वीर, रामा पारधी, मोहन उघडा, नरेश भल्ला उपस्थित होते.