उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील पाले येथील श्रीया फॉउंडेशन तर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. विविध उपक्रमांना जनतेचाही उत्तम प्रतिसाद मिळत असतो.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त श्रीया फाऊंडेशन पाले या सामाजिक संस्थेतर्फे पाले गावातील स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली.स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मंत्र अंगीकरून स्वच्छ सुंदर पाले गावाचा नारा देण्यात आला. यावेळी सर्वांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन ओला कचरा व सुका कचरा याचे व्यवस्थापन करून पाले गाव स्वच्छतेतून समृद्धी कडे नेण्याचा निर्धार केला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता म्हात्रे, संगीता म्हात्रे, दर्शना म्हात्रे, रविना म्हात्रे, रुचिता म्हात्रे, श्रीया म्हात्रे, गंगाराम म्हात्रे, संदीप म्हात्रे, मायनाथ म्हात्रे, श्रीयश म्हात्रे, यथार्थ म्हात्रे, गौरव म्हात्रे, आदींनी स्वच्छतेसाठी मेहनत घेतली.स्वच्छता अभियान राबवून श्रीया फॉउंडेशन पाले ने एक चांगला आदर्श समाजासमोर ठेवला आहे.