संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ६० विध्यार्थ्यांची इन्फोसिस मध्ये निवड – अमित कोल्हे

0

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची यशस्वी वाटचाल
कोपरगांव: संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत इन्फोसिस या साॅफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनीच्या ६० विध्यार्थ्यांची  आकर्षक  पगारावर निवड केली असुन संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने ग्रामिण विध्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्यात आघाडी घेतली आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की संजीवनीच्या प्रयत्नातुन विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत असलेले विद्यार्थी बहुतांशी  ग्रामिण भागातील आहे. मागील दोन आडीच वर्षांच्या   करोना महामारीच्या काळात सर्वच क्षेत्रातील अर्थकारण कोलमडले होते  यात ग्रामिण भागाला मोठा फटका बसला आहे. अशा  परीस्थितीत संजीवनीने अधिक नेटाने काम करून जास्तीत जास्त विध्यार्थ्यांना नोकऱ्या कशा  देता येईल यावर लक्ष केंद्रीत केले आणि यातुन मोठ्या  संख्येने विध्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळत आहे. इन्फोसिस या कंपनीने निवड केलेल्या  विद्यार्थ्यांमध्ये २०२१-२२ च्या अंतिम वर्षातील  काॅम्युटर इंजिनिअरींग विभागातील १४, इन्फर्मेशन टेक्नालाॅजी विभागातील ६,मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील १३, इलेक्ट्राॅनिक्स अँड  टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील ४, सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील ९ व इंलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील १४ नवादित अभियंत्यांचा समावेश  आहे. इन्फोसिस ही जरी साॅफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी असली तरी संजीवनी मधिल शिक्षणामुळे सर्वच विद्या शाखांमधिल नवोदित अभियंत्यांना नोरीची संधी मिळाली आहे.
संजीवनी ग्रुप   ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तसेच डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, सर्व विभाग प्रमुख  व   अँड  प्लेसमेंट डीपार्टमेंटच्या सर्व टीमचेही अभिनंदन केले.
फोटो ओळीः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, डायरेक्टर डाॅ. ए.जी.ठाकुर व विभाग प्रमुखांच्या समवेत इन्फोसिस कंपनी मध्ये निवड झालेले  नवोदित नवोदित  अभियंते.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here