समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेच्या प्रयत्नामुळे कामगारांना मिळाला बोनस व थकीत वेतन.

0

उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )

Continental CFS-DP World(खोपटे -उरण) ह्या कंपनीतील executive staff यांनी समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले असून यासंदर्भात युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कामगारांना प्रिंसिपल कंपनीत सामावून घेण्याबाबतील  समस्या तसेच दिवाळी बोनस व ईतर थकीत विषयी सकारात्मक चर्चा केली. 

 गेल्या अनेक बैठकीत विविध विषयावर (थकीत ग्रॅज्युएटी+दिवाळी बोनस+सुट्ट्यांचे पैसे+LTA)चर्चा होऊनही कंपनीकडून न चा पाढा चालू होता मात्र युनियनची यामध्ये कंपनीसोबत कायदेशीर चर्चा झाल्याने कामगारांचे सर्व थकीत अगदी चालू पगारासोबत सर्व जमा करण्यात आले.

 परंतु अनेक प्रश्न अजुनही प्रलंबित आहेत व त्यासाठी आम्ही पुन्हा लवकरच तिथल्या प्रशासनासोबत बैठक लावून याबाबत नक्की कामगारांना न्याय मिळवून देऊ असे प्रतिपादन युनियनचे अध्यक्ष अतुल भगत ह्यांनी केले.

दिवाळी बोनस सहित सर्व थकीत मिळाल्यामुळे सर्व कामगारांनी याबाबत अतुल भगत  आणि समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे आभार मानले.

लवकरच कामगारांच्या अनेक समस्यांवर तोडगा काढण्यात येईल व जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही व वेळ पडल्यास इथल्या प्रशासनाला वेठीस धरुन आत्तापर्यंत केलेल्या सर्व गैरकारभाराचा हिशोब सुद्धा कंपनीला द्यावा लागेल असे वक्तव्य युनियनचे अध्यक्ष अतुल भगत ह्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here