सातारा, स्वामी सदानंद : सातारा तालुक्यातील भरतगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन शिक्षिकांमध्ये हाणामारी झाली. याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतली आहे.
या मारहाण प्रकरणाचा अहवाल सातारा पंचायत समितीकडून मागविण्यात आला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.
<p>भरतगाव येथील प्राथमिक शाळेत सायंकाळी 4.30 वाजता दोन शिक्षिकांमध्ये मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात शिक्षिका रंजना चौरे व शिक्षिका मनीषा भुजबळ यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. या परस्परविरोधी तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाण प्रकरणाची दखल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतली असून, पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱयांना या घटनेची चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती शबनम मुजावर यांनी दिली.
पंचायत समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या दोन महिलांचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापुढे कारवाईसाठी ठेवण्यात येणार आहे. शिक्षिकांच्या मारहाणीच्या प्रकरणामुळे शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेची बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे मुजावर यांनी सांगितले.
Attachments area
सातारा, स्वामी सदानंद : सातारा तालुक्यातील भरतगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन शिक्षिकांमध्ये हाणामारी झाली. याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतली आहे.
<p> या मारहाण प्रकरणाचा अहवाल सातारा पंचायत समितीकडून मागविण्यात आला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.
भरतगाव येथील प्राथमिक शाळेत सायंकाळी 4.30 वाजता दोन शिक्षिकांमध्ये मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात शिक्षिका रंजना चौरे व शिक्षिका मनीषा भुजबळ यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. या परस्परविरोधी तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाण प्रकरणाची दखल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतली असून, पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱयांना या घटनेची चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती शबनम मुजावर यांनी दिली.