सातारा : साताऱ्यात तहसीलदारांचे ग्रेड पे साठी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच दोन तास धरणे आंदोलन केले. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार असे ४० जण सहभागी झाले होते.
आंदोलन हा हक्क आहे. न्यायासाठी सर्वसामान्य आंदोलन करत असतो. सरकारच्या विरोधात अलिकडे शेतकऱ्यांपासून अंगणवाडी सेविकांपर्यंत, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासन राज्य सरकारी कर्मचारी आंदोलन करत असतात परंतु सोमवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतील प्रवेशद्वारामध्ये दोन तास धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने करण्यात आले. त्यांची मागणी नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे ४८०० रुपये करण्यात यावा, ही मागणी मान्य न झाल्यास (दि. २८) पासून काम बंद आंदोलन करण्यात येईल, असे स्मरणपत्र देण्यात आले आहे.