सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारं उदयोन्मुख नेतृत्व संकेत राक्षे

0

प्रतिनिधि पुणे स्नेहा उत्तम मडावी 

कै. अण्णासाहेब मगर मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात पदार्पण केलेले संकेत राक्षे हे उच्च शिक्षित असून विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात संकेत राक्षे यांचा हातखंडा आहे. त्यांना वडील संदीप राक्षे, चुलते राजूशेठ राक्षे आणि भाऊ गौरव, रितेश यांचा खंबीर पाठिंबा आहे. दरवर्षी गणेशोत्सवाचे आयोजन स्वखर्चाने करीत असतात तसेच भव्य नवरात्र उत्सव साजरा करीत असतात नऊ दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करून परिसरातील बंधू भगिनींच्यासाठी विविध गुण दर्शन स्पर्धा, दांडिया, होम मिनिस्टर, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबु चमचा, भोंडला तसेच गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करून थकलेल्या कामगार नगरीतल्या कामगार बंधू भगिनींना आनंद देण्याचे कार्य संकेत राक्षे करीत आहेत.

यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा जिथे भटक्या विमुक्त जातीची मुल शिकतात त्या शाळेतील मुलांना सतत मदत करीत असतात नुकताच शाळेला युवा नेते रवी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त एल सी डी भेट दिला आहे. कै. अण्णासाहेब मगर मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी नवरात्र उत्सवात भव्य असे बालाजी मंदिराची सजावट केलेली आहे. ही सजावट भोसरी गावचे विशेष आकर्षण बनले आहे. ही सजावट पहाण्यासाठी विशेष गर्दी होत आहे. या वर्षी होम मिनिस्टर या महिलांच्या कार्यक्रमासाठी विविध आकर्षक भेट वस्तू बक्षिस म्हणून ठेवलेल्या आहेत.

मंडळाचे आधारस्तंभ भोसरीचे आमदार महेश लांडगे, मा आमदार विलास लांडे, मा. नगरसेवक अजित गव्हाणे, रवी लांडगे, नितीन लांडगे, गणपत लांडगे, संतोष लोंढे, नाना काटे, सचिनभैय्या लांडगे, संजय उदावंत, विराज लांडे, संजय वाबळे, नम्रता लोंढे, कुंदा भिसे, सारिका लांडगे, शुभांगी लोंढे, तुषार सहाणे, आकाश कंद, राकेश पठारे, शिवराज काटे, तसेच संकेत राक्षे यांना मोलाची साथ रोहीदास भोसले, योगेश बनसोडे, गणेश लांडगे, गणेश राऊत, अभिजित भोसले, शुभम राऊत, कमलाकर भडके, भवरलाल चौधरी, आशिष धुमाळ, प्रसाद किरवे, निरंजन चव्हाण, राजेश साठे, अजय चव्हाण, रोहीत तापकीर, जाहीद शाह, श्रेयस लांडगे, पियुष चौधरी, हारून शेख यांची मिळत आहे याच मित्र परिवाराच्या मदतीने संकेत राक्षे समाज सेवेची वाटचाल करीत आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here